

Why Some People Sweat More During Workouts: Doctor Explains
esakal
Excessive Sweating While Exercising: व्यायाम करताना स्नायूंची हालचाल वाढल्याने शरीरातील उष्णता वाढते आणि अंतर्गत तापमान नियंत्रित राखण्यासाठी घाम येतो. त्वचेवरील घाम बाष्पीभवनाद्वारे शरीरातील उष्णता बाहेर टाकून शरीर थंड ठेवण्याचे काम करतो.
प्रत्येक व्यक्तीला येणाऱ्या घामाचे प्रमाण वेगवेगळे असते. काही जणांना खूप लवकर आणि जास्त घाम येतो, तर काहींना तुलनेने कमी घाम येतो. जास्त घाम येणे म्हणजे नेहमीच एखादा आजार आहे असे नाही, पण घामाच्या प्रमाणात अचानक किंवा असामान्य बदल झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.