Women’s Day 2024 : ऑफिसमधील कर्मचाऱ्यांचा महिला दिन बनवा स्पेशल, या आयडिया येतील कामी

तुम्ही सर्व महिला कर्मचाऱ्यांना गुलाब देऊनही दिवस खास बनवू शकता
Women’s Day 2024 : ऑफिसमधील कर्मचाऱ्यांचा महिला दिन बनवा स्पेशल, या आयडिया येतील कामी

Women’s Day 2024 :

लवकरच आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जाणार आहे. या विशेष प्रसंगी, तुम्ही तुमच्या कार्यालयातील महिलांसाठी काही खास करून त्यांना आनंदित करू शकता. 1910 पासून आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेष पद्धतीने साजरा केला जात आहे.

महिलांप्रती असलेले प्रेम आदर व्यक्त करण्यासाठी याहून सुंदर दिवस कुठलाच नाही. तुमच्या कंपनीत असेलल्या महिलांना स्पेशल दिवस बनवण्यासाठी तुम्ही नव्या आयडिया शोधत आहात का? तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. (Women's day)

Women’s Day 2024 : ऑफिसमधील कर्मचाऱ्यांचा महिला दिन बनवा स्पेशल, या आयडिया येतील कामी
Women's Day : परगावात नोकरी करणाऱ्या महिलांना मुलांसह राहाण्यासाठी सरकार देणार जागा

ट्रिप प्लॅन करा

जर तुमच्या ऑफिसमध्ये जास्त महिला कर्मचारी नसतील तर तुम्ही तुमच्या ऑफिसजवळ कुठेतरी सहलीला जावे. तुमच्या ऑफिसमधल्या महिलांना हे खूप आवडेल. या सहलीचे आधीच प्लॅनिंग करा. कारण अचानक उठून महिला ट्रिपला येऊ शकणार नाहीत.

Women’s Day 2024 : ऑफिसमधील कर्मचाऱ्यांचा महिला दिन बनवा स्पेशल, या आयडिया येतील कामी
देशातील ३० प्रसिद्ध महिला कलाकारांच्या कला पाहा - Women's Day 2023

गिफ्ट द्या

तुम्ही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तुमच्या कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांनाही भेटवस्तू देऊ शकता. भेटवस्तू महागच हवी असे काही नाही. तुम्ही त्यांना चॉकलेट किंवा पेन आणि डायरी भेट म्हणून देऊ शकता. असे केल्याने तुमच्या ऑफिसमधील महिलांना ते खूप आवडेल.

Women’s Day 2024 : ऑफिसमधील कर्मचाऱ्यांचा महिला दिन बनवा स्पेशल, या आयडिया येतील कामी
Women's Day 2024 : भारतातील 'हे' शहर महिलांसाठी आहे सर्वात सुरक्षित; फिरायला गेल्यानंतर 'या' ठिकाणांना नक्की द्या भेट

गुलाब द्या

तुम्ही सर्व महिला कर्मचाऱ्यांना गुलाब देऊनही दिवस खास बनवू शकता. अनेक कंपन्यांचे बजेट फारसे नसते. त्यामुळे महिलांना हा दिवस खास वाटावा यासाठी त्यांनी डेस्कवर गुलाब ठेवावा. जेणेकरून त्यांना ऑफिसला आल्यावर छान प्रसन्न वाटेल.

Women’s Day 2024 : ऑफिसमधील कर्मचाऱ्यांचा महिला दिन बनवा स्पेशल, या आयडिया येतील कामी
Women's Day 2024 : ‘मी शारीरिक संबंधाला नकार दिला तर माझ्या नवऱ्याने..’;घटस्फोटाला धीटपणे सामोरे जाणाऱ्या तिची कहाणी

फनी गेम्स ठेवा

ऑफिसमध्ये जेव्हा कधी काही गेम्स असतात तेव्हा मुलींपेक्षा मुले जास्त भाग घेतात. आपण आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या विशेष प्रसंगी कंपनीतील महिलांसाठी एक गेम प्लॅन बनवा. जेणेकरून त्या दिवशी स्त्रिया कामापासून थोडे लक्ष काढून त्यांचा वेळ मजेत जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com