Women's Day 2024 : ‘मी शारीरिक संबंधाला नकार दिला तर माझ्या नवऱ्याने..’;घटस्फोटाला धीटपणे सामोरे जाणाऱ्या तिची कहाणी

बाळंतपणासाठी मी माहेरी गेले सासरकडच्या लोकांनी मला परत नेण्यास नकार दिला
Women's Day 2024
Women's Day 2024esakal

Women's Day 2024 :   

लवकरच जागतिक महिला दिन येणार आहे. त्यानिमित्ताने सोशल मिडिया अन् सगळ्या वृत्तवाहिन्या, वार्तापत्रात महिलांच्या यशोगाथा, उद्योजिका महिला यांच्यावर रकानेच्या रकाने भरून येतात. पण या सगळ्यात महिलांच्या अडचणींवर कोणीही बोलत नाही. महिलांच्या समस्या त्यांना होणारा मानसिक त्रास यावर फारशी चर्चा होत नाही.

त्यामुळेच आपल्या यावर्षीच्या महिला दिनानिमित्त आपण आपल्या जवळपासच असलेल्या काही महिलांच्या गोष्टी ऐकणार आहोत. ज्यांना छोट्या छोट्या गोष्टीसाठी संघर्ष करावा लागत आहे. 

आजची आपली गोष्टी पुण्यात राहणाऱ्या अर्चनाची (नाव बदलले आहे) आहे. अर्चना मुळची पुण्याची. तिचे पहिली ते दहावी शालेय शिक्षण तिथेच झाले. मुळातच अभ्यासात हुशार होती.  नंतर वडिलांची बदली सांगलीला झाली. तिथे बारावी सायन्सचा अभ्यास केला. पुढे चांगल्या मार्कांनी पास होऊन तिने फार्मसीचे शिक्षण २००७ मध्ये पूर्ण केले. या दरम्यान घरचे लग्नासाठी प्रयत्न करत होते.

Women's Day 2024
Women Fashion : उंची कमी आहे? मग कपडे खरेदी करताना 'या' टिप्स ठेवा लक्षात

काही ना काही कारणाने मुलाकडच्या लोकांचा नकार येत होते. शेवटी माझ्या दुर्दैवाने कोल्हापूरचे स्थळ आले. मुलगा शिकलेला होता व्यवसाय होता. स्वतः चे घर होते, त्यामुळे नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. दोघांच्याही पत्रिका जुळल्या अन् लग्नाचा मुहूर्त गाठला.

अनेक लग्नात किमान नव्याचे नऊ दिवस तरी सगळं चांगलं असतं. पण, माझ्या नशिबात सगळं उलटच होतं. लग्न झालेल्या दिवसापासून नवरा व सासूबाई रंग दाखवायला लागल्या. पारंपरिक कुटुंब होतं आणि मी चौकोनी कुटुंबातून आलेली. मला थोडा वेळ लागला सर्वकाही शिकायला. पण सासूबाईंना माझा रागच येत होता.

नवऱ्याच्या अपेक्षा तर पहिल्या रात्री पासूनच अचंबित करणाऱ्या होत्या. मुळात मी एक साधी सुधी सर्व सामान्य घरातील मुलगी होते. कॉलेजमध्ये मैत्रिणींनाही शारीरिक संबंध या विषयाचा गंध नव्हता. आपले घर, शाळा, आई वडील, अभ्यास या व्यतिरिक्त मला काही कळत नव्हते.

Women's Day 2024
Women Fashion : उंची कमी आहे? मग कपडे खरेदी करताना 'या' टिप्स ठेवा लक्षात

याउलट माझा नवरा होता. त्याला सगळ्याच सखोल ज्ञान होते. मला हे सर्व भयावह वाटले, शारीरिक संबंधाच्या बाबतीत काही गोष्टी आठवल्या तर आजही अंगावर शहारे येतात. आमच्या घरी लॉन्ड्रीवाला घरी नवऱ्याचे कपडे घेऊन यायचा. त्याला बिल, हिशोब देताना नवऱ्याने पाहिलेले. यानंतर भांडणात असताना एकदा सेक्स ला नकार दिला तर संशय घेतला.

तुझं आणि लॉन्ड्रीवाल्याचे अनैतिक संबंध असतील असा संशय त्याने घेतला. यानंतर मी कोलमडूनच गेले. पुढे वर्षभर मला या गोष्टीचा मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान मी पण नकार न देता सहन केले आणि मला दिवस गेले. चार महिने झाल्यावर मी काम करत नाही, झोपते, आणखी काही कारणे काढून माहेरी पाठवलं.

केवळ शारीरिक नाही तर मानसिकदृष्ट्याही माझा कोंडमारा होत होता. कारण, सकाळी उठल्यापासून घरकाम अन् आराम फक्त रात्रीच मिळायचा. यातूनही कधी मोकळेपणाने आईशी गप्पा माराव्या म्हटलं तर तेही बोलू देत नव्हते. लग्न केल्यानंतर माझा जगाशी संपर्कच कमी झाला. पाहुणे मंडळींमध्येही कधी जाऊ दिलं जात नव्हतं. गल्लीतल्या कोणाशीही बोलले तरी सासूबाई भांडण काढायच्या.  

Women's Day 2024
Women Health : चाळीशीतही दिसाल अगदी आकर्षक, दररोज फॉलो करा फक्त 10 मिनिटांचं फिटनेस रुटीन!

यथावकाश मला मुलगा झाला. बाळंतपणासाठी मी माहेरी गेले ती आलीच नाही. कारण, सासरकडच्या लोकांनी मला परत नेण्यास नकार दिला. थेट नकार नाही पण जेव्हा कधी मी परत येण्याबद्दल बोलायचे तेव्हा टाळाटाळ करायचे. बाळाला पहायला यायचे अन् निघून जायचे.

माझं बाळ आठ महिन्याचे झाले. किती दिवस आईकडे राहणार. एक दिवस गेले परत सासरी. गेले तेव्हा ये रे माझ्या मागल्या 'सुरु झाले. मला ही मुलाला जास्त सांभाळू देत नव्हते. एकटं खोलीत ठेवायच्या मला. नवरा, मुलगा, सासु बाहेर झोपायचे. खुप त्रास होत होता या गोष्टींचा.

सासूने नंतर आईकडे कटकट करून घटस्फोट मागितला हे खुप वाढत गेले. शेवटी मुलगा तिथेच ठेवून माहेरी निघून आले मी ती कायमचीच. तीन वर्षानी घटस्फोट झाला. मुलाची कस्टडी मिळावी म्हणून अनेक प्रयत्न केले. पण, मुलाची कस्टडी त्यांच्याकडे गेली. कारण त्यांनी मला कमवत नाही, स्वास्थ्य ठीक नाही असे सांगून न्यायालयाला फसवले होते.

Women's Day 2024
Women's Day 2024 : दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणे स्वर्गाहून सुंदर आहेत, महिलांनो सोलो ट्रॅव्हलिंगचा करा प्लॅन

2011 पासून मी माहेरी पुण्यात आहे. माझे काय चुकले अजून मला समजलं नाही. या सर्व त्रासाचा धक्का सहन न झाल्याने माझी आई गेली व मी पोरकीच झाले. भावाचं लग्न झाले वडिलांनीही मला साथ दिली नाही.

काही कारणाने मी फेसबुक अकाऊंट काढले. 2017 साली माझी महाडची मैत्रीण अश्विनीने सोशल मिडियावर मला पाहिले. खुप प्रयत्न करून नंबर मिळवला. हक्काचे कुणीतरी मिळालं. मग तिनेच बाकी मित्र-मैत्रिणींना शोधून व्हाट्स अँप ग्रूप केला. त्यानंतर आयुष्याला नव वळण मिळालं.

मित्र-मैत्रिणींसोबत मीही माझा भुतकाळ विसरून राहू लागले. अनेकींनी मला मला दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला. पण स्थळ मिळालं नाही. दरम्यान पुन्हा मुलाच्या कस्टडीची केस सुरु झाली. ताबा त्यांनाच मिळाला. रीतसर दुसरं लग्न त्यांनी केले.

Women's Day 2024
Women's Day 2024 : भारतातील 'हे' शहर महिलांसाठी आहे सर्वात सुरक्षित; फिरायला गेल्यानंतर 'या' ठिकाणांना नक्की द्या भेट

कोर्टाने मला महिन्यात एकदा मुलाला भेटायची परवानगी दिली आहे. पण मुलगा हा नाजूक धागा आमच्याकडे असून पण संसार वाचवायला यश आले नाही. मी परत डिप्रेशनमध्ये गेले. त्याच्या मला दिवसभरात दहा तरी गोळ्या असतात. काय करू आता, काहीच राहिले नाही.

वडील पण 2023 ला गणपती घरी बसले त्याच दिवशी गेले. खूप वाईट परिस्थिती आहे माझी. भावाचा संसाराला त्रास नको म्हणून मी रिहाब सेंटरला राहते. आयुष्याच्या शेवटाकडे जाण्याची वाट पाहत जगत आहे. आता सगळाच भूतकाळ आहे. वर्तमान आहे, तो फक्त मी जिवंत आहे, हे सांगतो.

 

Women's Day 2024
Women's Day 2024 : भारतातील 'हे' शहर महिलांसाठी आहे सर्वात सुरक्षित; फिरायला गेल्यानंतर 'या' ठिकाणांना नक्की द्या भेट

लाखमोलाचा सल्ला

आपल्या या मैत्रिणीला ऍड. सविता शिंदे सांगतात की, अशा रोजच्या अनेक केस आम्ही कोर्टात पाहतो. महिलांनी एक तर कुठल्याही प्रकारचा त्रास सहन करायचा नाही. कारण गुन्हा होत असताना पाहणं, आणि त्रास सहन करणं हाही एक गुन्हाच आहे.

अनेकवेळा महिला आई वडिल, समाज काय विचार करेल, एकटीला जगू देईल का हा विचार करून घटस्फोटाचा विचार मनातून काढून टाकतात. आणि जेव्हा सगळं काही हातातून निसटून जातं तेव्हा आत्महत्येचा विचार करतात. पण महिलांच्या सुरक्षेसाठीच कायदा आहे.

घटस्फोटाच्या केसमध्ये एकट्या बाईला स्वत:ची आणि मुलांची अशा दोन पोटगी मिळतात. तसेच कोणत्याही भावनेच्या भरात पोटगीवर हक्कसोडपत्र देऊ नये.तसेच अशा प्रकरणात कोर्टाकडूनही विशिष्ट रक्कम महिलांना दिली जाते.

महिलांनी अन्यायाला वाचा फोडायला शिकले पाहिजे. ज्या महिला कुठे जॉब करत नाहीत. ज्यांचे शिक्षण कमी आहे. अशा महिलांनी स्वत:चे स्कील डेव्हलप करावे. ज्यामुळे त्यांचा जगण्यासाठी एखादे माध्यम मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com