तुम्ही 'Work From Home' करताय? या टिप्स फॉलो करा अन् राहा फीट

वर्क फ्रॉम होममुळे शरीरावर अनेक दुष्परीणाम दिसून येत आहे.
Work From Home
Work From Homesakal

कोरोनामुळे अनेकांना घरुन काम करण्याची सवय लागली. कोरोना काळात कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेता अनेक कंपनीनी कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्यास सांगितले.आता कोरोना आटोक्यात येत असताना अनेकांना वर्क फ्रॉम होमची सवय लागली. आता प्रत्येकजण घरुन काम करण्यास प्रथम प्राधान्य देत आहे. मात्र याच वर्क फ्रॉम होममुळे शरीरावर अनेक दुष्परीणाम दिसून येत आहे. (Working from home is becoming more common as a result of its multiple advantages but there are a few potential drawbacks to remote work as well.)

संगणक, लॅपटॉपवर दिर्घवेळ काम करताना कर्मचारी एकाच ठिकाणी बसलेले असतात. या सर्वांचा परिणाम आपल्या जीवनशैलीवर पडतो. त्यामुळे घरुन काम करताना या खालील टीप्स फॉलो करा. (Check out some ways that will help you to stay fit while working from home)

Work From Home
पती-पत्नीच्या या चार सवयी वाढवतात भांडण... सुधारल्यास होईल वैवाहिक जीवन सुखी

१. दिवसाची सुरुवात व्यायामाने करा

घरुन काम सुरु करताना शरीराचा हालचाल करणे, आवश्यक आहे. त्यामुळे दिवसाची सुरवात व्यायामाने करा. व्यायामामुळे स्नायू दुखणे कमी होण्यास मदत होणार.

२. व्यायामाची साहित्य जवळपास ठेवा

सतत लॅपटॉपवर किंवा संगणकावर ८-९ तास बसणे अशक्य आहे आणि तुम्ही बसल्यास याचे विपरीत परीणाम तुम्हाला दिसून येईल. जेव्हा तुम्ही तुमच्या कामातून ब्रेक घेता, तेव्हा तुम्ही पुशअप्स करू शकता. किंवा व्यायम करण्याचे इतर साहित्य बाजूला ठेवले तर त्यांच्या मदतीने तुम्ही ब्रेकमध्ये व्यायम करु शकता. यामुळे तुमच्या शरीराच्या हालचाली होणार आणि तुमच्या शरीरावर विपरीत परीणाम पडणार नाही.

Work From Home
युद्धग्रस्त सैनिक अन् नागरिकांसाठी रेड क्रॉस ठरतीये देवदूत; जाणून घ्या इतिहास

३. वारंवार उठणे:

बाहेर जेवायला जाणे किंवा घरी काहीतरी घरकाम करणे. यामुळे तुम्हाला हालचाल करता येईल.

४. दिनचर्या विकसित करा

ऑफीसला जात असताना आपण एक दिनचर्या फॉलो करायचो मात्र आता 'वर्क फ्रॉम होम' मुळे दिनचर्या नाहीशी झाली आहे. मात्र दिनचर्याच तुम्हाला ट्रॅकवर ठेवू शकते. घरून काम करतानानस्वतःसाठी नियमित सवयी लावणे महत्त्वाचे आहे. नियमितपणे उठण्याची वेळ निश्चित करा आणि तुमचे काम आणि ब्रेक शेड्यूल करा. नियमितपणे व्यायम करते.व्यायामाची आठवण करून देण्यासाठी फिटनेस अॅप्स वापरा.

५. कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ब्रेक घ्या

ब्रेकसाठी टायमर सेट करा. एका goal वर लक्ष केंद्रित करा. तुमचा अलार्म वाजल्यावर फेरफटका मारा किंवा मित्राशी बोला. तुमचा मेंदू आणि शरीर रिचार्ज करा.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com