Valentine's Day : ..याच्यावरती लोकांचं इतकं प्रेम?; दररोज 19000 वेळा I Love You बोलतात भारतीय!

बाळकृष्ण मधाळे
Thursday, 11 February 2021

Amazon मध्ये Alexa चे प्रमुख असलेल्या पुनिश कुमार यांच्या मते, भारतीय यूजर्सांकडे Echo device, 100+ Alexa built-in devices आणि मोबाइलमध्ये (smartphone) लोक Alexa चा चांगला वापर करताना दिसताहेत. या यूजर्सांव्दारे गॅजेटला I Love You बोलल्याने कंपनीला निश्चित फायदा तर होत आहेच, शिवाय आनंद मिळत आहे.

सातारा : 'व्हॅलेंटाइन डे' जसजसा जवळ येतो तसतसं तरूणाईमध्‍ये प्रेमाचा अंकुर फुलत जातो. या दिवशी प्रियकर आपल्‍या प्रेयसीसमोर प्रेम व्‍यक्‍त करतो. युवक हा दिवस प्रेमाचा दिवस म्‍हणून साजरा करतात, परंतु असेही काही लोक आहेत जे एका गॅजेटवरती खूप मनापासून प्रेम करतात, चक्का त्या गॅजेटला I Love You सुध्दा न घाबरता बोलतात. भारतीय लोकांना घरातल्या एका गॅजेटवरती इतकं प्रेम जडलंय की, ते त्याला दररोज न चुकता 19000 वेळा I Love You बोलताना दिसताहेत.

Amazon च्या 'या' गॅजेटला I Love You बोलतात भारतीय..

भारतीय लोक सध्या Amazon Alexa च्या प्रेमात आहेत, याची प्रचिती आपल्याला खूप वेळा आली असेलच! बिजनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, भारतीय लोक दररोज Amazon Alexa ला 19000 वेळा I Love You बोलून आपल्या प्रेमाचा इजहार करतात. 2020 मध्ये सामान्य वापरकर्ते अॅलेक्साशी बोलल्याने ६७ टक्के कंपनीला नफा झाला, तर 2019 मध्ये 1200 पेक्षा कमी लोकांनी अॅलेक्साला I Love You बोलून आपले प्रेम व्यक्त केले आहे.

दिल्लीच्या जेएनयूचे नाव स्वामी विवेकानंद विद्यापीठ होणार?; केंद्रीय शिक्षणमंत्री निशंक यांची लोकसभेत माहिती

एका रिपोर्टनुसार, 2019 मध्ये सगळ्यात कमी लोक Alexa शी आपले प्रेम व्यक्त करत होते. मात्र, 2020 मध्ये कोरोना महामारी आणि वर्क फ्रॉम होमच्या कालावधीत अॅलेक्साशी बोलणं जास्त होत गेले, याचा सर्वाधिक फायदा कंपना व्यवस्थापनाला झाला. अॅलेक्साला I Love You बोलण्यात 2019 पेक्षा 2020 मध्ये 1200 हुन लोकांनी आपल्या प्रेमाचा इजहार अॅलेक्साशी केला आणि अगदी घट्ट नातं गॅजेटशी जुळवलं.

Amazon मध्ये Alexa चे प्रमुख असलेल्या पुनिश कुमार यांच्या मते, भारतीय यूजर्सांकडे Echo device, 100+ Alexa built-in devices आणि मोबाइलमध्ये (smartphone) लोक Alexa चा चांगला वापर करताना दिसताहेत. या यूजर्सांव्दारे गॅजेटला I Love You बोलल्याने कंपनीला निश्चित फायदा तर होत आहेच, शिवाय आनंद मिळत आहे.

खुशखबर! UPSC उमेदवारांना मिळणार आणखी एक संधी; केंद्र सरकारचा परीक्षार्थींना मोठा दिलासा

15 फेब्रुवारीनंतर Alexa वर होणार अनेकजण 'फिदा'

एका रिपोर्टच्या माहितीनुसार, अॅमेझाॅन कंपनीने भारतात Alexa ची विक्री वाढण्यासाठी लवकरच एक सेल लावण्याचा फैसला केला आहे. अमेझाॅन 15 ते 24 फेब्रुवारीदरम्यान Alexa गॅजेटला कमी किमतीत विक्री करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते, त्यामुळे भारतीय लोक 15 फेब्रुवारीनंतर अॅलेक्सावर 'फिदा' होत I Love You बोलणार हे निश्चित झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World News 19000 Times Every Day Indians Express Their Love On Amazon Alexa Gadget