World Piano Day 2024 : केवळ छंद म्हणून नाही, तर मानसिक आरोग्यासाठीही फायद्याचं आहे पियानो वाजवणं; जाणून घ्या फायदे

World Piano Day 2024 : जगभरात दरवर्षी २९ मार्चला ‘जागतिक पियानो दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
World Piano Day 2024
World Piano Day 2024esakal

World Piano Day 2024 : जगभरात दरवर्षी २९ मार्चला ‘जागतिक पियानो दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आजकाल प्रत्येक समारंभामध्ये आणि संगीत कार्यक्रमामध्ये पियानोचा हमखास वापर केला जातो. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना हे वाद्य वाजवायला आवडते. परंतु, तुम्हाला हे माहित आहे का? की पियानो वाजवल्याने आपले मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

संगीत हे आपल्या जीवनात महत्वाची भूमिका पार पाडते. संगीत म्हटलं की मधुर गाणी, विविध प्रकारची वाद्ये आणि त्यातून उमटणारे स्वर हे सर्व आपल्या डोळ्यांसमोर येते. गाणी, संगीत हे जणू आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग झाले आहेत.

संगीत ऐकल्याने आपल्याला छान झोप येते, मानसिक-शारिरीक विकासावर संगीताचा सकारात्मक प्रभाव पडतो. आज जागतिक पियानो दिनानिमित्त आम्ही तुम्हाला पियानो वाजवल्याने होणारे फायदे कोणते आहेत? ते सांगणार आहोत.

World Piano Day 2024
Music Therapy : वाद्य वाजवल्यामुळे चांगली राहते स्मरणशक्ती, मेंदू राहतो तरूण; रिसर्चमध्ये दावा

मूड सुधारण्यास मदत होते

जेव्हा तुमचे मन उदास असते किंवा तुमचा मूड चांगला नसतो, तेव्हा अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पियानोची मदत घेऊ शकता. पियानो वाजवल्याने तुमचा मूड रिफ्रेश होतो. मनातील उदासीनता दूर होण्यास मदत होते आणि शरीरातील हॅपी हार्मोन्समध्ये वाढ होते. त्यामुळे, आपल्याला चांगले वाटते. आपला मूड सुधारतो.

मनाची एकाग्रता वाढते

संगीत ऐकल्याने मन एकाग्र होण्यास मदत होते. शास्त्रीय संगीतामध्ये अनेक वाद्यांचा समावेश होतो. सतार, तबला, हार्मोनिअम, तंबोरा या वाद्यांसोबतच आजकाल पियानोचा ही वापर वाढला आहे. पियानो वाजवल्याने मनाची एकाग्रता वाढण्यास मदत होते, असे अनेक अभ्यासांमधून समोर आले आहे. पियानो वाजवल्याने मनाची एकाग्रता तर वाढते शिवाय मन स्थिर राहण्यास मदत होते.

आराम मिळतो

निसर्गात वेळ घालवल्याने तसेच पियानो, शांततापूर्ण संगीत आणि स्ट्रिंग वाद्ये वाजवल्याने मनाला आराम मिळतो आणि शांती मिळते. पियानो वाजवल्याने ताण-तणाव, राग, उदासीनता इत्यादी गोष्टी दूर होतात आणि मेंदूला आराम मिळतो. असे काही अभ्यासांमधून समोर आले आहे. संगीताचा आपल्या मनावर भावनिक प्रभाव पडतो आणि आपला मूड सुधारतो. ज्यामुळे, आपले मानसिक आणि शारिरीक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

World Piano Day 2024
Music Therapy: स्ट्रेस-एन्झायटी टाळण्यासाठी फायद्याची ठरतेय 'म्युझिक थेरपी' ; जाणून घ्या त्यामागील शास्त्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com