World Soil Day 2023 : जागतिक मृदा दिनानिमित्त 'माती वाचवा' आंदोलन आणि मातीच्या बचावाबद्दल जाणून घ्या

दरवर्षी ५ डिसेंबरला जगभरात ‘जागतिक मृदा दिन’ साजरा केला जातो.
world soil day 2023
world soil day 2023 esakal

World Soil Day 2023 : दरवर्षी ५ डिसेंबरला जगभरात ‘जागतिक मृदा दिन’ साजरा केला जातो. माती ही आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे. कारण, मातीमुळेच आपल्याला अन्न, कपडे, औषधे आणि आश्रय इत्यादी चार महत्वाच्या साधनांचा उपभोग घेता येतो, आणि माती या सर्वांचा प्रमुख स्त्रोत आहे. त्यामुळे, मातीचे संरक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

मातीमध्ये अनेक पोषकतत्वांचा समावेश आढळून येतो. या घटकांमध्ये विविध खनिजे, सेंद्रिय पदार्थ आणि हवा यांचा समावेश असतो. वनस्पतींच्या वाढीसाठी माती महत्वाची असून अनेक कीटकांचे आणि इतर जीवांचे ती माय आहे. मागील काही वर्षांमध्ये जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे. मातीचे नुकसान देखील होत आहे.

मातीच्या नुकसानाबाबत जनजागृती करण्यासाठी जगभरात दरवर्षी ५ डिसेंबरला जागतिक मृदा दिन साजरा केला जातो. आज जागतिक मृदा दिन आहे, त्या निमित्ताने आपण ‘माती वाचवा आंदोलना’ बद्दल आणि मातीचा बचाव करणाऱ्या मार्गांबद्दल जाणून घेणार आहोत.

माती वाचवा आंदोलन

देशात १९७७ मध्ये 'माती वाचवा' या आंदोलनाची सुरूवात मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथून करण्यात आली होती. येथील तवा धरणामुळे शेतीयोग्य मातीचे रूपांतर हे दलदलीमध्ये होत चालले होते. त्यामुळे, शेतीतून उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते.

या कारणांमुळे तेथील शेतकऱ्यांनी ‘माती वाचवा’ हे आंदोलन सुरू केले होते. मागील वर्षी हे आंदोलन पुन्हा चर्चेत आले होते. त्यानंतर, मागील वर्षीच्या पर्यावरण दिनानिमित्त दिल्लीत ‘माती वाचवा चळवळ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृदा संवर्धन या विषयावर अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या.

खरे तर हे आंदोलन २०२२ मध्ये पुन्हा सुरू झाले. मात्र, आता या आंदोलनाबाबत काही अपडेट पहायला मिळत नाही.

मातीचा बचाव करण्याचे मार्ग कोणते?

  • प्लॅस्टिकचा वापर टाळावा

  • जंगलतोडीवर बंधने घालावीत

  • वृक्ष लागवडीवर भर द्यावा

  • उतारावर असलेल्या जमिनीवर बंधारे बांधून जमिनीची धूप थांबवावी.

  • शेतीची नांगरणी करताना ती उताराच्या विरुद्ध दिशेने करावी.

world soil day 2023
World Soil Day : जमिनीचे आरोग्य बिघडले; अन् उत्पन्न घटले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com