World Sparrow Day: उन वाढतंय! चिऊताईसाठी असा सुसह्य करुया उन्हाळा अन् देऊया आसरा

World Sparrow Day: सध्या उन्हाळा आहे, त्यामुळे आपणही जमेल तशा गोष्टी करून चिमणी तिच्यासारख्याच अनेक छोट्या पक्ष्यांसाठी आणि आजू-बाजूच्या प्राण्यांसाठी हा उन्हाळा सुसह्य करू शकतो.
World Sparrow Day
World Sparrow DaySakal

World Sparrow Day: चिमणी, अगदी छोटासा पक्षी, पण तिच्या चिवचिवाटाने आसपासचा संपूर्ण परिसर गजबजलेला वाटतो. चिमणी हा पक्षी मानवाच्या जवळपास राहणारा पक्षी. जसजसा मनुष्यवस्ती वाढत गेली, तसससा चिमणीचा वावरही वेगवेगळ्या देशात वाढला आणि जगभर चिमणी हा पक्षी सर्वांना माहित झाला.

पण हा मानवीवस्तीजवळ राहणारा छोटा पक्षी हळुहळू दिसेनासा होऊ लागला. चिमणीच्या संवर्धनाची गरज त्याचमुळे हळुहळू वाढू लागली. यामुळेच २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस चिमण्यांबद्दल जागृती करण्यासाठी साजरा करण्यात येतो.

World Sparrow Day
World Sparrow Day : 'त्यांनी' घराच्या गॅलरीलाच बनवले पक्षीघर! पक्ष्यांना निवारा देण्याचा प्रयत्न

दरम्यान, सध्या उन्हाळा आहे, त्यामुळे तापमानातही वाढ होत आहे. अशात आपणही काही छोट्या आणि जमेल तशा गोष्टी करून चिमणी तिच्यासारख्याच अनेक छोट्या पक्ष्यांसाठी आजू-बाजूच्या प्राण्यांसाठी हा उन्हाळा सुसह्य करू शकतो. आपण अशा कोणत्या गोष्टी करून चिमणी संवर्धानासाठी योगदान देऊ शकतो, हे जाणून घेऊ.

राहण्यासाठी जागा

चिमणीसारख्या छोट्या पक्षांना राहायला फार मोठी जागा लागत नाही. त्यामुळे एखाला छोटा बॉक्स किंवा सॉफ्ट ड्रिंकची बॉटल नीट कापून तिच्या कडांमुळे इजा होणार नाही, याची काळजी घेऊन घराबाहेर ते ठेवता येईल. ज्यामध्ये चिमणी गवतं आणून तिचे घरटे बांधू शकते. किंवा अगदी ज्यांना जमत असेल, ते बर्डहाऊसही घेऊ शकतात.

World Sparrow Day
Sparrow Count Activity : राज्यात 31 जिल्ह्यांतून 8 हजार चिमण्यांची नोंद!

पाण्याची व्यवस्था

उन्हाळा म्हटलं की तहान मोठ्या प्रमाणात लागते. त्यामुळे पाणी सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमच्या अंगणात किंवा गॅलरीत, टेरेसवर किंवा बाहेर पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करू शकता. एखाद्या छोट्या भांड्यात पाणी ठेवू शकता.

ज्यामुळे हा उन्हाळा त्यांच्यासाठी सुसह्य होईलच, पण पाण्याच्या शोधात त्यांना फार भटकावे लागणार नाही. याशिवाय ज्यांना जमेल, ते काहीप्रमाणात दाणेही ठेवू शकतात.

झाडे लावा

जर तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी मोठी जागा असेल, तर तुम्ही मोठी झाले लावू शकता. ज्यामुळे पक्षांना त्यावर घरटे बांधून आसरा घेता येऊ शकतो. ज्यामुळे परिसर तर हिरवागार राहिलंय याशिवाय पक्षांच्या सुमधूर आवाजही कानावर पडत राहिलं, त्याचबरोबर त्यांना नैसर्गिक पद्धतीने राहताही येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com