Yoga Tips : उन्हाळ्यात शरीर सक्रिय ठेवण्यासाठी ‘ही’ योगासने आहेत फायदेशीर, दररोज करा सराव

Yoga Tips : उन्हाळ्यात शरीराला थकवा येतो आणि शरीरातील ऊर्जा कमी होते.
Yoga Tips
Yoga Tipsesakal

Yoga Tips : उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा ३५ च्या पुढे गेला आहे. त्यामुळे, उष्णतेवर मात करण्यासाठी आपण सर्वांनी आरोग्याची नीट काळजी घेणे गरजेचे आहे. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे, योग्य आहार, झोप यांसोबतच योगा देखील तितकाच उपयुक्त आहे.

उन्हाळ्यात शरीराला थकवा येतो आणि शरीरातील ऊर्जा कमी होते. ही ऊर्जा दिवसभर टिकावी यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. जेणेकरून शरीर हायड्रेटेड राहील. यासोबतच योग्य आहार आणि विविध योगासनांचा नियमितपणे सराव करणे फायदेशीर आहे.

या योगासनांचा जर तुम्ही दररोज सराव केला तर उन्हाळ्यातही तुमचे शरीर सक्रिय राहील आणि शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहील. कोणती आहेत ही योगासने? चला तर मग जाणून घेऊयात या योगासनांबदद्ल.

Yoga Tips
Yoga For Hair Growth : वयाच्या पंचवीशीतच केस पांढरे व्हायला लागलेत? मग, ‘या’ योगासनांचा करा सराव

उत्कटासन

पायांचे स्नायू निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी हे योगासन अतिशय फायदेशीर मानले जाते. नियमितपणे उत्कटासनाचा सराव केल्याने शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत होते. तसेच, संपूर्ण शरीराच्या स्ट्रेचिंगसाठी हे योगासन लाभदायी मानले जाते. उत्कटासनाचा रोज सराव केल्याने आपले शरीर दिवसभर सक्रिय ठेवले जाते. या योगासनामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि मूड फ्रेश राहण्यास मदत होते.

शलभासन

शलभासन या योगासनाचा दररोज सराव केल्याने बिघडलेल्या जीवनशैलीशी संबंधित समस्यांवर मात केली जाते. तसेच, या योगासनाचा नियमितपणे सराव केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. हे योगासन करायला अतिशय सोपे आहे. पाठीचा कणा, मान, छाती आणि खांदे मजबूत ठेवण्यासाठी हे योगासन उपयुक्त आहे.

शलभासनाचा दररोज सराव केल्याने शरीराला ऊर्जा मिळते. मूड रिफ्रेश करण्यासाठी आणि चांगल्या झोपेसाठी तुम्ही हे योगासन दररोज करू शकता. यामुळे, तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होईल. रक्ताभिसरण वाढवण्यासाठी हे योगासन फायदेशीर ठरू शकते. तुम्ही केवळ दररोज ५-१० मिनिटे या योगासनाचा सराव केल्यास शरीर दिवसभर सक्रिय राहण्यास मदत होऊ शकते.

Yoga Tips
Yoga For Healthy Skin : हेल्दी आणि ग्लोईंग त्वचेसाठी फायदेशीर आहेत ‘ही’ योगासने, जाणून घ्या सरावाची पद्धत अन् फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com