Ambadas Danve : अजित पवारांवर गुन्हा नोंद करा ; अंबादास दानवे

‘मतदान यंत्राची बटणे कचाकचा दाबा, नाहीतर निधी देताना हात आखडता घेऊ,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे.
Ambadas Danve
Ambadas Danve sakal

छत्रपती संभाजीनगर : ‘मतदान यंत्राची बटणे कचाकचा दाबा, नाहीतर निधी देताना हात आखडता घेऊ,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे त्यांच्यावर आचारसंहिताभंगाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी (ता. १८) केली.

पत्रकार परिषदेत अंबादास दानवे म्हणाले, की अजित पवार यांनी ‘बटण दाबा आणि निधी घ्या’ अशाच प्रकारचे वक्तव्य केले आहे. निवडणूक हा काय धंदा आहे का? असा प्रश्‍न करत अजित पवार यांच्यावर गुन्हा नोंद व्हायला हवा, त्याबाबत आम्हीही रीतसर तक्रार करणार आहोत, असे दानवे यांनी सांगितले.

‘‘निवडणूक आयोगाचे लक्ष केवळ विरोधी पक्षांवरच आहे. आयोग आता झोपला आहे का?’’ असा प्रश्‍नदेखील दानवे यांनी केला. ‘‘एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होऊन त्यांचा प्रचार सुरू झाला आहे, असे असताना दुसरीकडे महायुतीला अजूनही उमेदवार सापडत नाहीत.

Ambadas Danve
Latur Loksabha Constituency : राज्यघटनेबाबत काँग्रेसकडून अपप्रचार ; बावनकुळे

त्यामुळे त्यांच्या नेत्यांमध्ये उद्‍विग्नता दिसून येत आहे. भाजपला सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांना प्रचारासाठी महाराष्ट्रात आणवे लागत आहे, हे आमचे यश आहे’’, असेही दानवे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com