Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankulesakal

Chandrashekhar Bawankule : पक्ष विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही ; बावनकुळे यांची शरद पवार यांच्यावर टीका

‘‘आपला पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करणे, असा शरद पवार यांचा इतिहास आहे. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा पराभव स्पष्ट दिसत असल्याने पवार यांना पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही,’’ अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

पुणे : ‘‘आपला पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करणे, असा शरद पवार यांचा इतिहास आहे. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा पराभव स्पष्ट दिसत असल्याने पवार यांना पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही,’’ अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पुणे लोकसभेचे महायुतीचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे, मनसेचे नेते बाबू वागस्कर, शहरप्रमुख साईनाथ बाबर आदी उपस्थित होते.

Chandrashekhar Bawankule
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

प्रादेशिक पक्षांचे काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चेबाबत बावनकुळे म्हणाले, ‘‘सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार असल्याने शरद पवार यांना पक्ष विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही. शरद पवार यांनी ‘पुलोद’चा प्रयोग केला. त्यानंतर त्यांनी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता, हा त्यांचा इतिहास आहे. तसेच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीत दोन पक्ष संपणार असल्याचे सांगितले आहे. त्यावरून विलीनीकरण होणार हे लक्षात आले असेलच, असा टोलाही बावनकुळे यांनी लावला.

‘निवडणूक रोख्यांमधून मिळालेले पैसे वाटले जात आहेत,’ असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. त्यावर बावनकुळे यांनी टीका करत चव्हाण यांचे वक्तव्य अपरिपक्व आहे. रोख्यांमधून मिळालेल्या पैशांचा हिशेब प्राप्तीकर विभागाला द्यावा लागतो. निवडणुकीत पैसे वाटपाचे उद्योग काँग्रेसचे आहेत. बारामतीच्या निवडणुकीत पैसे वाटपाचे व्हिडिओ व्हायरल करणे, तक्रारी करणे हा विरोधकांचा नियोजित कट होता, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

बावनकुळे म्हणाले...

  • कांदा निर्यातीवरील निर्बंध उठवल्याचे स्वागत

  • जीवनावश्यक वस्तूंबाबतचे निर्णय आचारसंहितेत घेता येतात

  • राज ठाकरे महायुतीबरोबर आल्याने उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे दुखावले

  • पराभव दिसत असल्याने विरोधकांकडून खोटे आरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com