Dilip Ghosh, Supriya Shrinate: कंगनावर केलेली आक्षेपार्ह टीका भोवली! काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत ठरल्या दोषी; निवडणूक आयोगानं दिले 'हे' आदेश

महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल भारतीय निवडणूक आयोगानं भाजप खासदार दिलीप घोष आणि काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची निंदा केली आहे.
 Kangana Ranaut Supriya Shrinate
Kangana Ranaut Supriya Shrinate

नवी दिल्ली : निवडणूक आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी भाजपचे नेते दिलीप घोष आणि काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत हे दोषी ठरले आहेत. निवडणूक आयोगानं त्यांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर हा निकाल दिला असून आपल्या आदेशात त्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. (BJP Dilip Ghosh and Congress Supriya Shrinate found guilty in case of MCC)

काय म्हटलं निवडणूक आयोगानं?

महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल भारतीय निवडणूक आयोगानं भाजप खासदार दिलीप घोष आणि काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची निंदा केली आहे. आयोगानं म्हटलं की, आचारसंहिता उल्लंघनाबाबत या दोघांना बजावलेल्या नोटिसांचं उत्तर मिळाल्यानंतर आपला आदेश जाहीर केला आहे. (Latest Marathi News)

यात आयोगानं म्हटलं की, त्यांनी प्रचारादरम्यान वैयक्तिकरित्या हल्ला केला असून ही कृती आदर्श आचारसंहितेच्या तरतुदींचं उल्लंघन आहे, याची त्यांना खात्री आहे. त्यांना आदर्श आचारसंहितेच्या काळात सार्वजनिक भाषण करताना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळेपासून आयोगाकडून त्यांच्या निवडणुकीशी संबंधित संवादांवर विशेष लक्ष ठेवल जाईल, असंही आयोगानं म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com