Loksabha Election 2024 : यंदा मैदानावर नाही तर बूथवर लढाई ; भाजपची लोकसभेसाठी रणनीती ,चौक सभा, बैठक घेण्यावर भर

पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघात मोदी, योगींच्या सभा सोडल्यास भाजप मोठ्या प्रचारसभा घेणे टाळत आहे. अनेक मतदारसंघात अर्ज भरतानाही कार्यकर्त्यांची गर्दी जमविण्याचे नियोजन पक्षाने केले नव्हते.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 sakal

मुंबई : पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघात मोदी, योगींच्या सभा सोडल्यास भाजप मोठ्या प्रचारसभा घेणे टाळत आहे. अनेक मतदारसंघात अर्ज भरतानाही कार्यकर्त्यांची गर्दी जमविण्याचे नियोजन पक्षाने केले नव्हते. यंदाची लोकसभेची लढाई ही मैदानात लढण्यापेक्षा बूथवर लढण्याची भाजपची रणनीती आहे.

लोकसभेच्या पहिल्या टप्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात निवडणूका होत आहेत. या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी यांच्या सभा सोडल्यास भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या सभा होताना दिसत नाही. कारण सभेसाठी गर्दीचे नियोजन करणे,वाहतूक याच्यात पक्षाची शक्ती खर्च होते. त्यामुळे जनतेपर्यंत पोचण्यात अडचण होते.

त्यामुळे यावेळी मोठ्या सभा टाळून बूथ व्यवस्थापन मजबूत करण्याचे भाजपचे धोरण आहे. या वेळी लोकसभेची खरी लढाई बूथवर खेळली जात असल्याचे एका भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. अनेक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरतानाही गर्दी करण्याचेही पक्षाने टाळले. गर्दी जमवण्यावर शक्ती खर्च करण्यापेक्षा चौक सभा, बैठका घेण्यावर करा असा स्पष्ट आदेश पक्षाने दिला असल्याचे भाजप नेते सांगतात.

Loksabha Election 2024
Satej Patil Kolhapur : भाजपला रोखण्यासाठी मित्रपक्षांना झुकते माप

मेरा बूथ मजबूत

गेल्या काही काळात भाजपने पक्षाचे बूथ व्यवस्थापन अधिक मजबूत आणि सक्षम केले आहे. लोकसभा निवडणूका जाहीर होण्यापूर्वी बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच शक्ती केंद्र प्रमुखांच्या नियुक्त्या पक्षाने केल्या. आतापर्यंत पक्षाने बूथ प्रमुखांच्या दोन ते तीन बैठकाही झाल्या असून त्यामध्ये मतदानाची जय्यत तयारी केली आहे. मतदारांची ए,बी,सी अशी वर्गवारी करणे. यात भाजपच्या कन्फर्म उमेदवाराला ‘ए’, भूमिका अस्पष्ट असलेल्याला ‘बी’ तर प्रतिकूल असलेल्या मतदाराला ‘सी’ नामांकन दिले जाते. या यादीनुसार कार्यक्रम आखले जातात.

बूथ यंत्रणेचे काम

  • निवडणूकीत मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणणे

  • प्रत्येक घरापर्यंत पोचणे

  • योजनांची

  • माहिती पोचवणे

  • अनुकूल, प्रतिकूल मतदारांची यादी तयार करणे

  • मतदारसंघात धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेणे

पक्षाचा खर्च

  • प्रत्येक बूथमागे

  • १० ते १२ हजाराचा खर्च

  • प्रचार सामुग्री, वाहन

  • एका लोकसभेत सरासरी १८०० ते २००० बूथ असतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com