Loksabha Election Voting : मतदार स्लीप वाटपासाठी पुण्यात बूथ यंत्रणा कामाला

लोकसभा निवडणुकीत प्रचाराची रंगत वाढली असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. पण, त्याच वेळी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणून मतदान करून घेण्याचे आव्हान उमेदवारांपुढे आहे.
Loksabha Election Voting
Loksabha Election Votingsakal

पुणे, : लोकसभा निवडणुकीत प्रचाराची रंगत वाढली असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. पण, त्याच वेळी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणून मतदान करून घेण्याचे आव्हान उमेदवारांपुढे आहे. त्यासाठी मतदानाच्या एक आठवडा आधीच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, मतदानाची स्लीप वाटपासाठी बूथ यंत्रणा कामाला लावली आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे, एएमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके यांच्यात प्रमुख लढत होत आहे. यांच्या प्रचारासाठी राजकीय नेत्यांच्या सभा, मेळावे, बैठका होत आहेत. त्यामुळे शहरात निवडणुकीचे वातावरण तयार झाले आहे. मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे, तशी पुण्यात काय होणार? नवा खासदार कोण? असणार याचा अंदाज लावताना चर्चा रंगत आहे.

कडक उन्हाळ्यामुळे सकाळच्या टप्प्यात मतदान करून घेण्यावर भर आहे. त्यासाठी मतदारांना त्यांचे मतदान केंद्र, खोली क्रमांक, मतदार यादीतील क्रमांक याची माहिती पोचावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निवडणूक आयोगाकडून लोकसभा तसेच विधानसभा निहाय मतदारांची यादी तयार केली आहे. त्या माहितीचे ॲप राजकीय कार्यकर्त्यांनी डाऊनलोड करून दिले जात आहे. त्यामुळे बूथ प्रमुख, यादी प्रमुख हे त्यांच्या भागातील नागरिकांचे नाव शोधून देऊन ती माहिती प्रत्यक्ष घरी जाऊन तसेच मोबाइलवरून पाठवत आहेत.

Loksabha Election Voting
Loksabha Election : भाजपचा बालेकिल्ला भेदण्याचे ‘मविआ’समोर आव्हान

मतदार यादीत मतदान केंद्र बदलणे, कुटुंबातील मतदारांचे मतदान केंद्र विभागले जाणे, असे प्रकार झालेले आहेत. त्यामुळे मतदारांचा मतदानाच्या दिवशी गोंधळ उडण्याची शक्यता गृहित धरून पक्षांनी त्यांची यंत्रणा कामाला लावली आहे. काँग्रेसने उमेदवार धंगेकर यांचा जाहीरनामा घरोघरी वाटप सुरू केले आहे, त्या सोबत मतदारांना स्लीप वाटपाची व्यवस्था केली आहे. त्याच प्रमाणे बूथ प्रमुख व त्याखालील कार्यकर्ते मतदारांचे नाव मोबाइलवर शोधून ती माहिती व्हॉट्सअपवर पाठवत आहेत.

भाजपतर्फे विधानसभा निहाय मतदार याद्यांचे ॲप तयार केले आहे. या ॲपची लिंक मतदारांना पाठवली आत असून, त्यावर स्वतः त्यांचे मतदान केंद्र शोधत आहेत. त्याच प्रमाणे बूथची यंत्रणा घरोघरी जाऊन स्लीप वाटप करत आहे. प्रदेश भाजपकडून वीन नावाचे ॲप कार्यकर्त्यांना दिले आहे. हे फायदेशीर ठरत असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

उमेदवाराचा अहवाल आणि स्लीप वाटप एकाच वेळी केले जात आहे. त्याशिवाय ॲपचा वापर केला जात आहे. मतदार यादीत काही त्रुटी असल्याने मतदारांना नाव शोधणे अवघड जात असल्याने पक्षाच्या यंत्रणेकडून नावे शोधून देत आहोत. त्यामुळे आमच्या मतदारांचा टक्का वाढणार आहे.

- मोहन जोशी, प्रदेश उपाध्यक्ष,काँग्रेस

प्रत्येक प्रभागात लॅपटॉप, आॅपरेटर देण्यात आला आहे. बूथ प्रमुख, पन्ना प्रमुखांना सोसायटी, वस्त्यांमध्ये जाऊन ॲपद्वारे मतदानाची स्लीप देत आहेत. नागरिकांच्या मागणीनुसार ही माहिती त्यांच्या मोबाइलवर देखील पाठवली जात आहे. अनेकांचे मतदान केंद्र बदलले आहेत, अंतर वाढले आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी गोंधळ होऊ नये, यासाठी आम्ही आतापासून स्लीप वाटप करत आहोत.

- धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com