Mangaldas Bandal: मंगलदास बांदल यांना झटका! 'वंचित'नं रद्द केली शिरुरची उमेदवारी; कारणंही आलं समोर

नेमकं काय घडलंय जाणून घ्या
Mangaldas Bandal
Mangaldas Bandal

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्यावतीनं शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळं वंचितनं आता दुसरी उमेदवारी रद्द केल्यानं वंचितचं नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न विचारला जात आहे. पण बांदल यांची उमेदवारी का रद्द करण्यात आली, याचं कारणंही वंचितनं दिलं आहे. (candidature of Mangaldas Bandal from Shirur by Vanchit Bahujan Aghadi has been cancelled)

बांदल यांची उमेदवारी का केली रद्द?

वंचित बहुजन आघाडीच्यावतीनं शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तिथं उमेदवार न देण्याचे धोरण ठरवलं होतं. (Marathi Tajya Batmya)

पण वंचितच्या या धोरणाविरोधात बांदल यांनी भूमिका घेतल्यानं त्यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि रेखाताई ठाकूर यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

Mangaldas Bandal
Public Holiday at Madha: माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघात 7 मेला सार्वजनिक सुट्टी; मतदानाचा हक्क निभावण्याचं आवाहन

अमरावतीतूनही उमेदवाराची माघार

दरम्यान, यापूर्वी वंचितनं अमरावती इथून आपला उमेदवार जाहीर केला होता. प्राजक्त पिल्लेवान या त्यांच्या उमेदवार होत्या. त्यांनाही अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वंचितनं अर्ज न भरण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळं त्यांना या जागेवरही उमेदवारी रद्द करण्याची नामुष्की ओढवली होती. (Latest Maharashtra News)

पण याचं कारण म्हणजे अमरावतीतून प्रकाश आंबेडकर यांचे धाकटे बंधु आनंदराज आंबेडकर यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि भाजपला मदत होऊ नये म्हणून पिल्लेवान यांची उमेदवारी मागे घेत असल्याचं वंचितनं म्हटलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com