Chhagan Bhujbal : तुम्ही बीडकडे लक्ष द्यावे ,भुजबळ ; नाशिकवरून पंकजा मुंडे यांना टोला

‘खासदार प्रीतम मुंडे यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उभी करेन’, असे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या विधानावर मंत्री छगन भुजबळ यांनी टोलेबाजी केली आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalsakal

मुंबई : ‘खासदार प्रीतम मुंडे यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उभी करेन’, असे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या विधानावर मंत्री छगन भुजबळ यांनी टोलेबाजी केली आहे. ‘‘नाशिकमध्ये महायुतीच्या तिन्ही पक्षाकडे भरपूर उमेदवार असून, हीच मोठी अडचण आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी स्वतःच्या निवडणुकीकडे लक्ष द्यावे. त्यांनी निवडून येणे अत्यंत आवश्यक आहे,’’ असा टोला श्री भुजबळ यांनी मुंडे यांना लगावला.

नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. भाजप पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार आपण निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे, राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले होते. तर या मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे ही जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे, असा आग्रह शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.

मात्र या मतदारसंघात उमेदवारीचा निर्णय होत नसल्याने आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे श्री. भुजबळ यांनी जाहीर केले. आपण जरी माघार घेत असलो तरी, राष्ट्रवादीने या जागेवरील दावा सोडला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शिंदे गटासमोर पेच निर्माण झाला आहे.

Chhagan Bhujbal
Loksabha Election 2024 : शेतकरीकल्याणाला प्राधान्य ; कर्जमुक्तीचे उद्धव ठाकरेंचे वचन

बावनकुळेंकडून सारवासारव

राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. यातच आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून उमेदवारी देण्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने शिवसेना, राष्ट्रवादीसह भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. मुंडे यांच्या या वक्तव्यावर भुजबळ यांनी टोलेबाजी करत त्यांना स्वतःच्या मतदारसंघात लक्ष देण्याचा सल्ला दिला, तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी सारवासारव करत, ‘मुंडे यांचे वक्तव्य लोकसभेसाठी नसून, अन्य निवडणुकीबाबत असावे,’ असे स्पष्टीकरण दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com