Loksabha Election : विकासासाठी हवे नरेंद्र मोदींचे नेतृत्व ;बाणेर, पर्वतीमधील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

‘‘देशात इंडिया आघाडीची सत्ता आल्यास ते संगीत खुर्ची खेळून दरवर्षी नवा पंतप्रधान निवडत बसतील. कोरोनानंतर जगभरातील उद्योग चीनऐवजी भारतात येत असल्याने पुण्याला मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्याची संधी निर्माण झाली आहे.
Loksabha Election
Loksabha Electionsakal

पुणे : ‘‘देशात इंडिया आघाडीची सत्ता आल्यास ते संगीत खुर्ची खेळून दरवर्षी नवा पंतप्रधान निवडत बसतील. कोरोनानंतर जगभरातील उद्योग चीनऐवजी भारतात येत असल्याने पुण्याला मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्याची संधी निर्माण झाली आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याचे अनेक प्रकल्प मार्गी लावले. पुढील पाच वर्षांत आणखी विकास करण्यासाठी देशाला मोदीजींच्या कणखर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे भाजपला निवडून द्या,’’ असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केले.

Loksabha Election
Pune Lok Sabha: पुणे, शिरूरच्या मविआ अन् महायुतीच्या उमेदवारांना नोटिसा; काय आहे कारण?

पुणे लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ बाणेर आणि पर्वती येथे सभा झाली. त्यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, हर्षवर्धन पाटील, लक्ष्मणराव ढोबळे, शहराध्यक्ष धीरज घाटे, जगदीश मुळीक, लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, अमोल बालवडकर, बाबूराव चांदेरे, सुभाष जगताप, प्रदीप देशमुख, दत्ता गायकवाड, गणेश कळमकर, परशुराम वाडेकर आदी उपस्थित होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘युवकांचे संकल्पपत्रा’चे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते झाले.

फडणवीस म्हणाले, ‘‘आपल्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्यासाठी पाच वर्षांसाठी नेता निवडायचा आहे. गिरीश बापट यांनी चांगले काम केले; पण त्यांचे अकाली निधन झाले. आता तरुण तडफदार मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली. त्यांना दिलेले प्रत्येक मत मोदींना मिळणार आहे.’’

फडणवीस म्हणाले...

  • मोदींनी विविध योजनांमधून गरिबी कमी केली; महिला, तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले

  • ६४ कोटी लोकांना १० लाखांपर्यंतचे कर्ज विनातारण मिळाले, यात ६० टक्के महिला आहेत

  • २०२९ मध्ये ३३ टक्के महिला खासदार, आमदार असतील

  • सूर्यघर योजनेतून ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळेल

  • पंतप्रधान आवास योजनेतून हजारो घरे पुण्यात बांधली

  • समान पाणीपुरवठा, कचऱ्यापासून वीज निर्मिती, मुळा-मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्प, मेट्रोचे जाळे असे अनेक प्रकल्प पुण्यात झाले

  • स्वारगेट येथे मल्टीमॉडल हब होत आहे; सर्वाधिक ई-बस पुण्‍यात

  • नवीन विमानतळ, रिंगरोडमुळे रोजगाराच्या संधी वाढणार

  • २०१४ नंतर दहशतवादी हल्ले थांबले; हल्ले करण्याची पाकिस्तानची हिंमत झाली नाही

  • मोदींनी ५०० वर्षांची गुलामगिरी मिटवून राम मंदिर बांधले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com