Pune Lok Sabha: पुणे, शिरूरच्या मविआ अन् महायुतीच्या उमेदवारांना नोटिसा; काय आहे कारण?

Pune Lok Sabha: पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, शिरूरमधील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
Pune Lok Sabha
Pune Lok SabhaEsakal

राज्यात निवडणुकांचे प्रचार जोरदार सुरू आहेत. आत्तापर्यंत ३ टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता पुढीच टप्यातील निवडणूक प्रचार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या सर्व घटकावर निवडणूक आयोग बारीक लक्ष ठेवून आहे. अशातच पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, शिरूरमधील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

निवडणूक खर्चातील तफावती आढळल्याने प्रशासनाने नोटीस दिल्या आहेत. दुसर्‍या तपासणीत तफावतीमुळे उमेदवारांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. निवडणूक खर्चात तफावत आढळल्याने याबाबत खुलासा मागवण्यात आला आहे. निवडणूक खर्चाचे स्वतंत्र खाते न उघडल्याबाबत पुणे मतदारसंघातील अन्य चार उमेदवारांनाही नोटिसा देण्यात आल्या आहेत.

Pune Lok Sabha
Pune Crime News : गाडीची लाईट का चमकावली म्हणून २० जणांच्या टोळक्याकडून दोघांना मारहाण

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या दुसर्‍या टप्प्यातील खर्चाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 13 लाख 6 हजार 474 इतका खर्च दाखविण्यात आला आहे. मात्र, निवडणूक खर्चाबाबत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी शॅडो खर्चाचा अहवाल तपासून पाहिला. त्या वेळी प्रत्यक्षात दुसर्‍या टप्प्यात 49 लाख 34 हजार 58 रुपयांचा खर्च झाल्याची नोंद आढळली आहे. त्यामुळे 36 लाख 27 हजार 584 रुपयांच्या खर्चाची तफावत झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे मोहोळ यांना नोटीस देण्यात आली आहे. काँग्रेस आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्या खर्चात 11 लाख 67 हजार 709 रुपयांची तफावत आढळली आहे. त्यामुळे त्यांना नोटीस देऊन याबाबत खुलासा मागवण्यात आला आहे.

Pune Lok Sabha
Leopard Attack : बिबट्याचा हल्ल्यात जुन्नरला मुलाचा मृत्यू ; काळवाडी येथे घटना, आईने फोडला टोहो

त्याचबरोबर शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या शॅडो अहवालानुसार 53 लाख 38 हजार 334 रुपयांचा खर्च झाला असून, प्रत्यक्षात 22 लाख 91 हजार 548 रुपयांचा खर्च दाखविला आहे. त्यामुळे 30 लाख 46 हजार 786 रुपयांचा खर्चाची तफावत आढळली आहे.

तर अमोल कोल्हे यांनी 43 लाख 96 हजार 426 रुपयांचा खर्च झालेला असताना त्यापैकी केवळ 32 लाख 18 हजार 968 इतका खर्च दाखविला आहे. त्यामुळे त्यांच्या खर्चात 11 लाख 77 हजार 458 रुपयांची तफावत आढळली आहे. दोघांनाही नोटिसा देण्यात येऊन खुलासा मागण्यात आला आहे.

Pune Lok Sabha
Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

त्याचबरोबर शिरूर मतदारसंघातील बहुजन समाज पार्टीचे राहुल ओव्हाळ, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. अन्वर शेख, भारतीय जवान किसान पार्टीचे नारायण अंकुशे यांच्यासह एकूण सहा जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

कोणाची तफावत किती

- डॉ. अमोल कोल्हे - ११,७७,४५८ रुपये

- शिवाजीराव आढळराव पाटील - ३०,४६,७८६ रुपये

- रवींद्र धंगेकर - ११,६७,७०९ रुपये

- मुरलीधर मोहोळ - ३६,२७,५८४ रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com