Harshvardhan Patil : अखेर हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर ; फडणवीसांनी काढली समजूत,शिवतारेंशीही संवाद

बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) मताधिक्य मिळवून देण्याचे आश्वासन अखेर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिले. विधानसभेत परतफेड केली जाईल, या कबुलीवर त्यांनी हे आश्वासन दिले.
Harshvardhan Patil
Harshvardhan Patilsakal

मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) मताधिक्य मिळवून देण्याचे आश्वासन अखेर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिले. विधानसभेत परतफेड केली जाईल, या कबुलीवर त्यांनी हे आश्वासन दिले.

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या संभाव्य उमेदवारीविरोधात उभ्या राहिलेले शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांच्यासह हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘सागर’ बंगल्यावर भेट घेतली.

शिवतारे यांचा अधिकृत पक्ष शिवसेना शिंदे गट आहे. हर्षवर्धन पाटील हे बारामतीबाबत नाराज असलेले भाजप नेते आहेत. या पूर्वी फडणवीसांनी त्यांची भेट घेतली होती. आज हर्षवर्धन पाटील कार्यकर्त्यांसह ‘सागर’वर गेले. तेथे पोहोचल्यावर सुमारे दोन तासांनी बाहेर पडलेल्या पाटील यांनी पक्षाच्या आदेशाचा मान राखला जाईल.

Harshvardhan Patil
Vijay Shivtare : शिवतारे जाणून घेणार कार्यकर्त्यांची मते ; सासवडमध्ये आज बैठक,अपक्ष उमेदवारीबाबत मांडणार भूमिका

मात्र तेथे आम्ही लोकसभेत जी मदत करू, त्याची परतफेड विधानसभेत इंदापुरात मागू, असे स्पष्ट केले. इंदापूर या विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचे कट्टर समर्थक असलेल्या दत्ता भरणे यांनी पाटील यांचा सलग दोनदा पराभव केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप एकत्र आल्यामुळे पाटील परिवाराला उमेदवारी तरी मिळेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच ते बंडाच्या भूमिकेत होते. मात्र, आज आश्वासन मिळाल्यानंतर त्यांचा पवित्रा बदलला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com