Loksabha Election 2024 : खासदार शिंदेंसाठी आमदार पाटलांचा मनसे मेळावा ; डोंबिवलीत मनसेचा पहिला मेळावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिल्यानंतर कल्याण लोकसभा क्षेत्रात मनसेने महायुती उमेदवाराच्या प्रचारासाठी रणनिती आखली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आमदार पाटलांनी मनसे मेळाव्याचे आयोजन केले आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024sakal

डोंबिवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिल्यानंतर कल्याण लोकसभा क्षेत्रात मनसेने महायुती उमेदवाराच्या प्रचारासाठी रणनिती आखली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आमदार पाटलांनी मनसे मेळाव्याचे आयोजन केले आहे. डोंबिवलीत मनसेचा हा पहिला मेळावा 1 मे ला होणार असून आमदार पाटील मतदार, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

मनसे मेळाव्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी माहिती दिली. महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी डोंबिवलीत मनसे आमदार राजू पाटील हे स्वतः मेळावा घेणार आहेत. यावेळी मनसेचे वरिष्ठ नेते देखील उपस्थित असतील.

Loksabha Election 2024
Kalyan Lok Sabha : राजकारणात कधी शत्रुत्व तर कधी मैत्री ; कल्याण लोकसभेतील हे शिलेदार निभावतात वेगवेगळ्या भूमिका

कल्याण लोकसभेत मनसेचे जवळपास दीड लाख मतदार असून हे मतदान महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या पारड्यात पडण्यासाठी हा मेळावा भरवला आहॆ. यावेळी खासदार शिंदे आणि मनसे आमदार राजू पाटील हे मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहे.1 मे रोजी डोंबिवली मधील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात हा मेळावा आयोजित करण्यात आला आहॆ. असे भोईर म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारला बिनशर्त पाठींबा दिला आहे. त्यानंतर कल्याण लोकसभेतील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मनसेने कंबर कसली असून आपली ताकद लावायला सुरवात केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com