Hatkanangale Lok Sabha : महायुतीच्या उमेदवाराला मत म्हणजे पंतप्रधान मोदींनाच मत; काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे (Narendra Modi) सक्षम नेतृत्व असणे गरजेचे आहे.
Hatkanangale Lok Sabha Chandrakant Patil
Hatkanangale Lok Sabha Chandrakant Patilesakal
Summary

‘‘मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांची साथ हवी आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील मानेंच्या पाठीशी राहा.’’

इस्लामपूर : ‘‘देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे (Narendra Modi) सक्षम नेतृत्व असणे गरजेचे आहे. महायुतीच्या उमेदवाराला मत म्हणजे मोदींना, पर्यायाने विकासाला आहे. खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांना मताधिक्याने निवडून देऊन लोकसभेत पाठवूया,’’ असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर इस्लामपूर विधानसभा (Islampur Assembly) मतदार संघातील इस्लामपूर, आष्टा, बागणी, बावची येथे आयोजित भाजप बूथप्रमुख, सुपर वॉरियर्स, शक्ती केंद्रप्रमुख व भाजप प्रमुख पदाधिकारी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. माजी खासदार निवेदिता माने, जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, पृथ्वीराज पवार, लोकसभा निवडणूकप्रमुख सत्यजित देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (शिंदे गट) आनंदराव पवार, माजी मंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक, हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी, भीमराव माने, प्रसाद पाटील उपस्थित होते.

Hatkanangale Lok Sabha Chandrakant Patil
Jayant Patil : भाजपला '400 पार' राहू देत '200 पार' होताना नाकीनऊ येईल; आमदार जयंत पाटलांनी लगावला टोला

पाटील म्हणाले, ‘‘यंदाची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदींना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी व त्यांचे विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी आहे. महायुतीच्या उमेदवाराला मते द्यायची आहेत. काँग्रेसला ६० वर्षात जे जमलं नाही ते नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने दहा वर्षात करून दाखवले. विकासाशी नाते असणाऱ्यांमागे उभे रहा.’’

निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, ‘‘हातकणंगले लोकसभा (Hatkanangale Lok Sabha) मतदारसंघात विकासाचा संकल्प राबविण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला निवडून देऊया. मोदी सरकारने उज्ज्वला गॅस, सौभाग्य योजना, मुलींना मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना पीक विमा व पेन्शन योजनांचा लाभ देऊन सर्व घटकांना न्याय दिला. मराठा समाजाला कायम टिकणारे आरक्षण दिले. अनेक वर्षांपासून प्रलंबित पेठ-सांगली रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला.

Hatkanangale Lok Sabha Chandrakant Patil
दक्षिण महाराष्ट्रातून 'घड्याळ' गायब! बालेकिल्ल्यातच नाही चिन्ह; राष्ट्रवादी फुटीनंतर कोल्हापूर, सांगली, साताराचे चित्र

केंद्राच्या ‘हर घर जल’ योजनेंतर्गत गावोगावी जलजीवन योजनांना निधी दिला. घरोघरी नळ जोडण्या मिळाल्याने पाणीप्रश्न मार्गी लागला. पाच वर्षांत महायुतीच्या माध्यमातून जनतेच्या मूलभूत गरजा मार्गी लावण्याचे काम करू. मोदी सरकारच्या काळात स्थानिक पातळीवर झालेल्या विकासाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी करावे.’’

Hatkanangale Lok Sabha Chandrakant Patil
Satara Lok Sabha : साताऱ्यात शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे यांच्यात 'हाय होल्टेज' लढत; पवारनिष्ठा पणाला!

सत्यजित देशमुख म्हणाले, ‘‘मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांची साथ हवी आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील मानेंच्या पाठीशी राहा.’’ भाजपचे पदाधिकारी धैर्यशील मोरे, चंद्रकांत पाटील, निवास पाटील, मधुकर हुबाले, संदीप सावंत, दादासाहेब रसाळ, अशोकराव खोत, सुनीता काळे, अजित पाटील, संजय हवालदार, यदुराज थोरात, अभिजित पाटील, दत्तात्रय पाटील, भास्करराव मोरे, प्रवीण परीट, अक्षय पाटील, प्रवीण माने, डॉ. सतीश बापट, रणजित माने, माणिक जाधव, अक्षय कोळेकर, स्मिता पवार उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com