Jyoti Mete : शिवसंग्राम लोकसभेला तटस्थ राहणार

‘‘लोकसभा निवडणुकीत शिवसंग्राम संघटनेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. या निवडणुकीत महायुती किंवा महाविकास आघाडी कोणालाही समर्थन किंवा पाठिंबा देणार नाही.
Jyoti Mete
Jyoti Metesakal

पुणे : ‘‘लोकसभा निवडणुकीत शिवसंग्राम संघटनेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. या निवडणुकीत महायुती किंवा महाविकास आघाडी कोणालाही समर्थन किंवा पाठिंबा देणार नाही. मात्र विधानसभेला संघटनेतर्फे १२ जागांवर निवडणूक लढविली जाणार आहे.

Jyoti Mete
Pune Loksabha Constituency : राहुल गांधींची शुक्रवारी पुण्यात सभा

त्यावेळी स्वतंत्र बैठक घेऊन पुढील दिशा ठरवली जाईल,’’ अशी माहिती शिवसंग्राम संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. ज्योती मेटे यांनी दिली.

संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक शनिवारी पुण्यात झाली. त्यानंतर मेटे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट केली.

त्या म्हणाल्या, ‘‘लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत बीडच्या जनतेने मागणी केली होती. परंतु मी बीडमध्ये लोकसभा लढविणार नाही अशी भूमिका जाहीर केली. कारण आम्ही विधानसभेची चाचपणी केली. त्यामुळे जनतेच्या हिताचा आदर करण्यासाठी विधानसभेबाबत निर्णय घेतला आणि लोकसभेतून माघार घेतली.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com