K. Padmarajan : तब्बल २३८ वेळा निवडणूक लढविणारा बहाद्दर

‘आपल्याला पक्षाकडून उमेदवारी मिळेल का?’, ‘मिळाली तर आपल्याविरोधात कोण असेल?’, ‘मतदारांची साथ मिळून जिंकून येणार का?’ असे एक ना अनेक प्रश्‍न निवडणूक लढविण्याची इच्छा असणाऱ्या राजकीय नेत्यांना पडलेले असतात.
K. Padmarajan
K. Padmarajan sakal

किस्से निवडणुकीचे

धर्मापुरी (तमिळनाडू) : ‘आपल्याला पक्षाकडून उमेदवारी मिळेल का?’, ‘मिळाली तर आपल्याविरोधात कोण असेल?’, ‘मतदारांची साथ मिळून जिंकून येणार का?’ असे एक ना अनेक प्रश्‍न निवडणूक लढविण्याची इच्छा असणाऱ्या राजकीय नेत्यांना पडलेले असतात. पण हे असे प्रश्‍न तमिळनाडूमधील के. पद्मराजन यांना कधीही पडले नाहीत. ‘निवडणूक लढवायचीच’ हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर असल्याने त्यांनी आतापर्यंत २३८ वेळा निवडणूक लढविली आहे.

निवडणूक पंचायत समितीची असो की महानगरपालिकेची, विधानसभेची असो वा लोकसभेची, ती जाहीर झाली की लढवायचीच, असा पद्मराजन यांचा दंडकच आहे. त्यांनी राष्ट्रपती-उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकांसाठीही अर्ज भरले होते. आतापर्यंत त्यांनी सगळ्या मिळून २३८ निवडणुका लढविल्या आहेत. अर्थात, जनतेने त्यांना काम करण्याची एकदाही संधी दिलेली नाही. सर्वांत अयशस्वी उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌स’, ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्‌स’मध्ये नोंद आहे. म्हणूनच ते ‘निवडणूक राजा’ (इलेक्शन किंग) म्हणून प्रसिद्ध आहेत.

पासष्ठ वर्षांच्या के. पद्मराजन यांचे तमिळनाडूतील सालेम येथे टायर दुरुस्तीचे दुकान आहे. राज्यघटनेने निवडणूक लढविण्याबाबत आपल्याला दिलेल्या अधिकाराचा वापर करायला हवा, असे त्यांना वाटते. ‘‘मला हरायचेच आहे. जिंकल्याचा आनंद क्षणिक असतो, पराभवची आठवण कायम राहते,’’ असा तर्क ते लावतात. निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी आतापर्यंत एक कोटींहून अधिक रुपये खर्च केले आहेत.

K. Padmarajan
Loksabha Election 2024 : शिवसेनेला १४ जागा देण्याची भाजपची तयारी

त्यांनी ज्यांच्याविरुद्ध निवडणूक लढविली आहे, त्या नावांची यादी पाहिली तर थक्क व्हायला होते. या यादीत अटलबिहारी वाजपेयी, पी. व्ही. नरसिंह राव, जे. जयललिता, एम. करुणानिधी, ए. के. अँटनी, बी. एस. येडियुराप्पा, सदानंद गौडा या दिग्गजांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, १९९१ मध्ये आंध्र प्रदेशात नरसिंह राव यांच्याविरोधात निवडणूक लढवित असताना त्यांचे अपहरणही झाले होते. के. पद्मराजन यांच्याबद्दल एवढी चर्चा यासाठी की, यंदाही त्यांनी धर्मापुरी येथून लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com