Amit Shah In Bihar : नितीश कुमारांनंतर अमित शाहांनी लालूंच्या मुलांवर केली टीका; मुख्यमंत्र्यांचं तोंडभरुन कौतुक

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमारांचंही कौतुक केलं. नितीश यांनी गावागावात, घराघरात वीज पोहोचवली आहे. परंतु इंडी आघाडीवाले पुन्हा तुम्हाला कंदिलाच्या काळात घेऊन जाऊ इच्छित आहेत, असा आरोप अमित शाहांनी केला.
Amit Shah
Amit Shah Sakal

Loksabha election 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी बिहारच्या दौऱ्यावर होते. त्यांनी कटिहारमध्ये जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींसह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं कौतुक केलं.

''पंतप्रधान मोदींनी देशातून घराणेशाही, जातीयवाद आणि ध्रूविकरण संपवलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक घटकाचा आणि प्रत्येक व्यक्तीचा विकास होत आहे.'' असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.

कित्येक वर्षांपासून काँग्रेस पक्ष आणि त्यांचे सहकारी लालू प्रसाद यादव म्हणत होते, गरीबी हटाओ; परंतु गरीबी गेली नाही. मोदीजींनी केवळ १० वर्षांमध्ये २५ कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढलं आहे. लालू यादव आणि राबडी देवींनी मिळून बिहारला जंगलराजमध्ये बदलवून टाकलं आहे, अशी टीका अमित शाहांनी केली.

Amit Shah
Arvind Kejriwal : ''केजरीवालांनी इन्सुलिन मागितलंच नाही, डॉक्टरांचाही सल्ला नाही'', तिहार जेल प्रशासनाचं उत्तर

लालू मुलांसह काँग्रेसच्या मांडीवर बसले- शाह

अमित शाह पुढे म्हणाले की, गरीब, मागास, ओबीसी सगळ्यांवर अत्याचार होत होते. आज मात्र लालू यादव आणि त्यांची मुलं काँग्रेसच्या मांडीवर जावून बसले आहेत. हा तोच काँग्रेस पक्ष आहे ज्यांनी मागास समाजाला आरक्षण देणाऱ्या काका कालेलकर आयोगाच्या अहवालाला आणि मंडल आयोगाला विरोध केला होता.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणतात की राजस्थान आणि बिहारचं जम्मू काश्मीरशी काय देणंघेणं आहे. परंतु खर्गेजी तुम्हाला हे माहिती नाही, पण बिहारचा प्रत्येक मुलगा काश्मीरसाठी जीव द्यायला तयार आहे. मोदीजींनी नक्षलवाद समाप्त केला असून दहशतवादावरही कारवाई केली आहे. असं म्हणत अमित शाहांनी सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख केला.

Amit Shah
किस्से निवडणुकीचे! हरिभाऊंचा गेम झाला अन् एकनाथ खडसेंच्या सुनबाई खासदार झाल्या

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमारांचंही कौतुक केलं. नितीश यांनी गावागावात, घराघरात वीज पोहोचवली आहे. परंतु इंडी आघाडीवाले पुन्हा तुम्हाला कंदिलाच्या काळात घेऊन जाऊ इच्छित आहेत, असा आरोप अमित शाहांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com