Voting in Baramati
Voting in Baramatiesakal

Baramati Lok Sabha Constituency : दौंड शहरात रात्री सव्वाआठ वाजेपर्यंत मतदान

Baramati Voting : रिक्षा, चारचाकी आणि दुचाकी वाहने वापरून मतदारांना केंद्रांवर आणण्याची सुविधा

Baramati Election Voting : बारामती लोकसभा मतदारसंघातील काही मतदारांनी नेहमीप्रमाणे शेवटच्या क्षणी गर्दी केल्याने दौंड शहरात रात्री सव्वाआठ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत शांततेत ४३ टक्के मतदान झाले होते.

Voting in Baramati
Baramati News : बारामती लोकसभा मतदारसंघात गृहभेटीत २२८ जणांचे मतदान

दौंड तालुक्यातील एकूण ३०९ मतदान केंद्रांवर आज (ता. ७) सकाळी सात वाजता इलेक्ट्रॅानिक मतदान यंत्रांच्या साह्याने मतदानास सुरवात झाली. तालुक्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत ५ . ५ टक्के , सकाळी अकरा वाजेपर्यंत १२ टक्के आणि दुपारी एक वाजेपर्यंत २६ टक्के मतदान झाले होते.

सकाळी मतदान संथ गतीने सुरू असताना दुपारी तीन वाजेपर्यंत ३५ तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४३ टक्के मतदानाची नोंद झाली होती. दौंड तालुक्यात एकूण ३ लाख ४ हजार ६०७ मतदार आहेत.

सायंकाळी सहा वाजण्यापूर्वी दौंड शहरातील शेठ ज्योतीप्रसाद विद्यालय, श्रीमती गिताबाई बंब शाळा व स्वर्गीय लाजवंती गॅरेला विद्यालयातील मतदान केंद्रांवर मतदार मोठ्या संख्येने दाखल झाले. रिक्षा, चारचाकी आणि दुचाकी वाहने वापरून मतदारांना केंद्रांवर आणण्यात आले. त्यामुळे सहा वाजण्यापूर्वी मतदान केंद्राच्या आत उपस्थित सर्व मतदारांना टोकन देऊन मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले.

Voting in Baramati
Women Agitation on Voting Date: मतदानाच्या दिवशीच महिलांचं धरणं आंदोलन; व्यक्त केला संताप, मतदानावर बहिष्कार

या रांगांमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक होती. पोलिसांना या टोकन घेतलेल्या मतदारांना रांगेची शिस्त लावावी लागली. टोकन दिलेल्या मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

शेठ ज्योतीप्रसाद विद्यालयातील मतदान केंद्रांवर रात्री आठ तर श्रीमती गिताबाई बंब शाळेतील मतदान केंद्रांवर रात्री सव्वाआठ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com