Mamata Banerjee : महिलांच्या आत्मसन्मानाला हात लावू नका ; ममता बॅनर्जी यांचा मोदींना इशारा,‘इंडिया’च्या विजयाचा विश्‍वास

अत्याचार झाल्याबाबतचे खोटे दावे करत पंतप्रधानांनी बंगालमधील महिलांच्या आत्मसन्मानाशी खेळ करू नये, असे म्हणत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
Mamata Banerjee
Mamata Banerjeesakal

बोंगाव (पश्‍चिम बंगाल); अत्याचार झाल्याबाबतचे खोटे दावे करत पंतप्रधानांनी बंगालमधील महिलांच्या आत्मसन्मानाशी खेळ करू नये, असे म्हणत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. संदेशखाली प्रकरणावरून भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

बोंगाव येथे प्रचारसभेत तृणमूलच्या सर्वोच्च नेत्या ममता बॅनर्जी म्हणाल्या,‘‘पश्‍चिम बंगालमधील स्थिती भाजपशासित राज्यांसारखी नाही. आमच्या राज्यातील महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का लावू नका, त्याविरोधात कटकारस्थाने रचू नका.’’ संदेशखालीतील अत्याचाराच्या घटनांवर तृणमूलचे नेते पांघरूण घालत असल्याचा आरोप मोदींनी रविवारी झालेल्या सभेत केला होता. त्यामुळे तृणमूल ‘बॅकफूट’वर गेली होती. मात्र, संदेशखाली प्रकरणी आंदोलन करणाऱ्या महिलांना पैसे देऊन आणल्याचे सांगणारा एका भाजप नेत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तृणमूलनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे.

ममता म्हणाल्या,‘आमच्या महिलांना हात लावू नका. हे राज्य म्हणजे तुमचे उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेश नाही. बंगालमधील महिला कायम आदर आणि सन्मानाने जगतात,’ असे ममतांनी बजावले. केंद्रीय सुरक्षा यंत्रणेतील जवान तृणमूलच्या कार्यकर्त्यांची अडवणूक करत असल्याचा आरोपही ममता बॅनर्जींनी केला.

Mamata Banerjee
Rahul Gandhi : अंबानी-अदानींचे हित मोदींनी जपले ; रायबरेलीतील सभेमध्ये राहुल गांधी यांचा भाजपवर घणाघात

‘कायदा लागू करून दाखवाच’

पश्‍चिम बंगालमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करणारच, असे पंतप्रधान मोदींनी रविवारच्या सभेत म्हटले होते. त्याचा संदर्भ देत ममता म्हणाल्या,‘‘कोणत्याही अटींशिवाय हा कायदा कोणाला लागू करायचा असल्यास आमचा काही आक्षेप नाही. पण मग तुमच्या मंत्र्यांनी नागरिकत्व कायदा का लागू केला नाही? बंगालमध्ये हा कायदा लागू करूच देणार नाही.’’ याशिवाय, नागरिक नोंदणी पुस्तिका आणि समान नागरी कायदा लागू करून दाखवाच, असे आव्हानही ममतांनी केंद्र सरकारला दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com