Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तपोवन मैदानावर सभा झाली. पण काल रात्रीपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतील जोडण्या लावण्याबरोबरच राज्यातील इतर जागावाटपाचे तिढे सोडवण्यासाठी सभेला जाईपर्यंत पंचशील हॉटेलमध्ये तळ ठोकला.
Eknath Shinde
Eknath Shindesakal

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तपोवन मैदानावर सभा झाली. पण काल रात्रीपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतील जोडण्या लावण्याबरोबरच राज्यातील इतर जागावाटपाचे तिढे सोडवण्यासाठी सभेला जाईपर्यंत पंचशील हॉटेलमध्ये तळ ठोकला.

संजय मंडलिक, धैर्यशील माने यांच्यासाठी कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघातील हालचालींवर मुख्यमंत्री शिंदे लक्ष ठेवून आहेत. सभेच्यानिमित्ताने त्यांचे शुक्रवारी रात्रीच कोल्हापुरात आगमन झाले. पंचशील हॉटेलमध्ये काही काळ थांबून त्यानंतर त्यांनी दोन्ही मतदारसंघांतील माहिती घेतली. त्यानंतर रात्री हातकणंगले मतदारसंघासाठी इस्लामपूरला जाऊन काहींच्या भेटी घेतल्याचे समजते.

Eknath Shinde
Loksabha Election 2024 : जाहीरनाम्यात कामगार हक्क दुर्लक्षित ; नाममात्र पक्ष वगळता ठोस भूमिका नाही

तिथून आल्यानंतर आज सकाळपासून ते हॉटेलमध्येच थांबून होते. सकाळी धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह काहींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर काही तुरळक प्रमाणात त्यांच्या काहींशी भेटीगाठी झाल्या. पण त्यांचा बहुतांशवेळ स्वतंत्र रूममध्ये बसून ठिकठिकाणी संपर्क सुरू होता. त्यात महायुतीतील काही जागांबाबत निर्माण झालेल्या तिढ्याबाबत त्यांची सतत चर्चा सुरू होती.

दुपारनंतर मंत्री उदय सामंत यांचे हॉटेलवर आगमन झाले. त्यावेळीही काही काळ भेट झाल्यानंतर ते स्वतंत्र रूममध्ये थांबून होते. दुपारी एकच्या सुमारास ते अंबाबाई दर्शनाला बाहेर पडून काहींच्या भेटी घेणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे अनेक कार्यकर्ते थांबून होते. मात्र ते प्रतीक्षा करत थांबले असले तरी, मुख्यमंत्री मात्र बाहेर पडले नाहीत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री रामदास आठवले आल्यानंतर त्यांची मुख्यमंत्र्यांशी एकत्रित चर्चा झाली. त्यावेळी आमदार विनय कोरे यांचेही आगमन झाले. तिथून साडेचारच्या सुमारास सर्वजण सभेसाठी बाहेर पडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com