Nasim Khan: नसीम खान यांचा काँग्रेसच्या स्टार प्रचारकपदाचा राजीनामा; खर्गेंना लिहिलं सविस्तर पत्र

राज्यात एकही मुस्लिम उमेदवार न दिल्यानं व्यक्त केली नाराजी
Naseem Khan
Naseem Khan

मुंबई : मुंबई काँग्रेसचे नेते मोहम्मद आरीफ ऊर्फ नसीम खान यांनी आपल्या स्टार प्रचारकपदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडं सोपवला आहे. त्यामुळं आता उर्वरित लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यांसाठी नसीम खान हे स्टार प्रचारक म्हणून काम करणार नाहीत. (Nasim Khan resigns as Congress star campaigner writes detailed letter to Mallikarjun Kharge)

Naseem Khan
Manoj Jarange: विधानसभेला सर्व 288 जागांवर उमेदवार देणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

महाविकास आघाडीनं महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही, या कारणासाठी नसीम खान यांनी हा राजीनामा दिलेला आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना नसीम खान यांनी लिहिलं की, पक्षानं राज्यात एकही मुस्लिम उमेदवार न देण्याचा अयोग्य निर्णय घेतल्यानं मी अस्वस्थ झालो आहे. त्यामुळं माझ्या स्टार प्रचारकपदाचा राजीनामा देत आहे. (Latest Marathi News)

Naseem Khan
Lok Sabha Election 2024: देशभरात दुसऱ्या टप्प्यात 64.70 टक्के मतदान! महाराष्ट्रात 53.71 टक्के

दरम्यान, नसीम खान स्वतः मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, त्यांना पक्षानं उमेदवारी दिली नाही. नसीम खान हे चारदा राज्यात मंत्री व आमदार राहिले आहेत. त्यामुळं मुंबई काँग्रेसमध्ये त्यांचं वजन आहे. (Marathi Tajya Batmya)

Naseem Khan
Nanded Lok Sabha: मतदान करायला आला अन् ईव्हीएमवर घातले कुऱ्हाडीचे घाव! नांदेडमधील धक्कादायक घटना

"या निवडणुकीतही पक्षानं राज्यात तसेच बाहेरील राज्यातही प्रचार करण्याचा आदेश मला दिला होता. त्यासह पक्षाच्या सर्व आदेशांचे मी पालन केले. मात्र, राज्यात काँग्रेसनं एकाही मुस्लिम व्यक्तीस उमेदवारी का दिली नाही? या प्रश्नाचं उत्तर देण्यास माझ्याकडं शब्द नसल्यानं मी प्रचारात भाग घेऊ इच्छित नाही," असं खान यांनी आपल्या राजिनामापत्रात म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com