Loksabha Election 2024 : पुणे ४२, शिरूर ४६, मावळातून ३८ उमेदवारांचे अर्ज ; अखेरच्या दिवशी उमेदवारांची गर्दी

पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी (ता. २५) शेवटचा दिवस होता. त्यामुळे उमेदवारांनी गर्दी केली होती. पुण्यासाठी एकूण ४२, शिरूरसाठी एकूण ४६ आणि मावळसाठी एकूण ३८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024sakal

पुणे : पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी (ता. २५) शेवटचा दिवस होता. त्यामुळे उमेदवारांनी गर्दी केली होती. पुण्यासाठी एकूण ४२, शिरूरसाठी एकूण ४६ आणि मावळसाठी एकूण ३८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

अर्जांची छाननी शुक्रवारी (ता. २६) होणार आहे. सोमवारपर्यंत (ता. २९) अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्या दिवशी तिन्ही मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. पुणे, शिरूर आणि मावळ मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास १८ एप्रिलपासून सुरुवात झाली. याआधी पुणे मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गुरुवारी भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, तर ‘एआयएमआयएम’ तर्फे अनिस सुंडके आणि सैनिक समाज पक्षातर्फे कर्नल सुरेश पाटील (निवृत्त) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या प्रमुख उमेदवारांसह पुणे मतदारसंघातून एकूण ४२ उमेदवारांनी अर्ज दाखल केला.

शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाकडून डॉ. अमोल कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिरूरमधून एकूण ४६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे, महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील, वंचितच्या माधवी जोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या तिन्ही मतदारसंघांतील उमेदवारांच्या अर्जांची छाननी शुक्रवारी सकाळी होईल. सोमवारी अर्ज माघारीनंतर अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल.

निरीक्षकांकडून पाहणी

मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक बुदिथी राजशेखर यांनी गुरुवारी (ता. २५) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेची समक्ष पाहणी केली. त्यानंतर पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे मतदान यंत्र स्ट्रॉंगरूम, तेथील सुरक्षाव्यवस्था, सीसीटीव्ही कार्यप्रणाली आणि सर्व कक्षाच्या कामकाजाची माहिती घेतली.

Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 : दुसऱ्या टप्प्यासाठी आज ‘मतसंग्राम’; राज्यातील आठ मतदारसंघांत मतदान

नागरिकांना मनस्ताप...

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय दुपारी चारपर्यंत नागरिकांसाठी बंद ठेवले होते. परिणामी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून कामासाठी आलेल्या नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com