PETA Letter to ECI : रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत खेकडा आणल्यानं 'पेटा'ला आला राग; थेट पत्र लिहून दिला इशारा

रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका करण्यासाठी नुकतीच पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी संदर्भासाठी थेट जिवंत खेकडाच सादर केला होता.
Rohit Pawar_PETA Letter to ECI
Rohit Pawar_PETA Letter to ECI

नवी दिल्ली : रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका करण्यासाठी नुकतीच पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी आपल्या आरोपांच्या संदर्भासाठी त्यांनी थेट जिवंत खेकडाच सादर केला होता. पण आता त्यांच्या या कृतीवर प्राणी अधिकार संघटना 'पिपल फॉर एथिकल ट्रिटमेंट ऑफ अॅनिमल' अर्थात PETA ही संघटना आक्रमक झाली आहे.

यासाठी त्यांनी थेट निवडणूक आयोग आणि शरद पवारांना पत्र लिहून रोहित पवारांवर कारवाईची मागणी केली आहे. (PETA Letter to ECI and Sharad Pawar over Rohit Pawar press conference which he produce crab)

Rohit Pawar_PETA Letter to ECI
Rajnath Singh: "...तर भारत पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार करेल"; का दिला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इशारा?

पेटानं म्हटलं की त्यांचं हे कृत्य पशू क्रूरता निवारण अधिनियमाच्या आदर्श आचारसंहितेसह निवडणूक आयोगाच्या निर्देशांचं देखील उल्लंघन आहे. शरद पवार आणि जिल्हा निवडणूक अधिकारी मिनल काळस्कर यांना लिहिलेल्या पत्रात पेटा इंडियाच्या शौर्य अग्रवाल यांनी म्हटलं की, व्हिडिओवरुन हे स्पष्ट होतं की रोहित पवार पत्रकार परिषदेत जिवंत खेकडा आणणार होते हे पूर्वनियोजित होतं. पत्रकार परिषदेत स्टंट करण्यासाठी एका जीवाला अनावश्यक त्रास देण्यात आला आहे. (Marathi Tajya Batmya)

Rohit Pawar_PETA Letter to ECI
IPL 2024 RCB VS RR : संजू सॅमसनची सेना मारला विजयाचा 'चौकार' की बंगळूरु रोखणार राजस्थानचा विजयरथ?

शौर्य अग्रवाल यांनी म्हटलं की, संशोधनातून हे स्पष्ट झालं आहे खेकडे खूपच हुशार असतात त्यांना आपल्याला झालेला त्रास जाणवतो. तसेच त्यांना वातावरणाची जाणीवही असते, त्यामुळं ते एकमेकांशी संवादही साधतात. (Latest Marathi News)

Rohit Pawar_PETA Letter to ECI
IPL 2024 RCB VS RR : संजू सॅमसनची सेना मारला विजयाचा 'चौकार' की बंगळूरु रोखणार राजस्थानचा विजयरथ?

पेटानं रोहित पवारांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय?

पेटानं आपल्या पत्रात म्हटलं की, संघटनेनं निवडणूक आयोगाला या बाबीची माहिती देण्यात आला आहे. यामध्ये म्हटलं की निवडणूक प्रचार सभा आणि रॅलीजसाठी प्राण्यांना त्रास दिला जातो आहे. यानंतर निवडणूक आयोगानं राजकीय प्रचारासाठी प्राण्यांच्या वापरावर बंदी घातली होती. (Latest Maharashtra News)

यामध्ये म्हटलं की, सन २०१३ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार निवडणूक आयोगानं निवडणूक प्रचारादम्यान, गाढव, बैल, हत्ती आणि गाईंच्या वापरावर बंदी घातली होती. तसेच अधिकाऱ्यांनी उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. पेटानं रोहित पवारांना देखील पत्र लिहून त्यांच्याकडील खेकडा संस्थेकडं सोपवण्याची मागणी केली तसेच त्याची आम्ही देखभाल करु असंही म्हटलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com