Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

मोदी पुढे म्हणाले की, भारतीय सैनिक सध्या भारतीय बनावटीचे अत्याधुनिक हत्यारं वापरत आहेत. काँग्रेसच्या काळात शस्त्रांची दलाली व्हायची. त्यामुळे त्या लोकांना भाजपचं सरकार आलेलं चांगलं वाटत नाहीत. काँग्रेसने वन रँक वन पेन्शनला विरोध केला होता. मात्र भाजप सरकारने हक्काची पेन्शन देऊ केली आहे.
PM Narendra Modi Ramtek
PM Narendra Modi Ramtekesakal

Satara Loksabha election 2024 : साताऱ्यात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. मोदींनी यावेळी २०१३ मधील एक जुनी आठवण सांगितली.

पंतप्रधान म्हणाले की, २०१३ मध्ये जेव्हा भाजपने माझी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषणा केली तेव्हा मी सगळ्यात अगोदर रायगडावर आलो. तेव्हा तर निवडणुकाही नव्हत्या. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक झालो. कोणतंही काम करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा ऊर्जादायी ठरते.

PM Narendra Modi Ramtek
Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

''तेव्हा रायगडावरुन घेतलेल्या ऊर्जेवर मागची दहा वर्षे मी देशासाठी काम करत आहे. साताऱ्याची भूमी ही शौर्याची भूमी आहे. देशसेवेसाठी सैनिक देणारी भूमी आहे.'' असं म्हणत मोदींनी सैनिकांसाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा वाचला.

मोदी पुढे म्हणाले की, भारतीय सैनिक सध्या भारतीय बनावटीचे अत्याधुनिक हत्यारं वापरत आहेत. काँग्रेसच्या काळात शस्त्रांची दलाली व्हायची. त्यामुळे त्या लोकांना भाजपचं सरकार आलेलं चांगलं वाटत नाहीत. काँग्रेसने वन रँक वन पेन्शनला विरोध केला होता. मात्र भाजप सरकारने हक्काची पेन्शन देऊ केली आहे.

PM Narendra Modi Ramtek
CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

''भारतीय नौदलाचा झेंडा आतापर्यंत इंग्रजांचा होता. परंतु मोदीने नौदलाच्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकाला स्थान दिलं.'' असं म्हणून मोदींनी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालत असल्याचं म्हटलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com