Prakash Ambedkar: न्याय यात्रेला हजेरी अन् डिनर डिप्लोमसी! प्रकाश आंबेडकरांची नाराजी दूर?

प्रकाश आंबेडकर अन् राहुल गांधी एकाच मंचावर येणार, 'न्याय यात्रे'च्या समारोप सभेला लावणार हजेरी
Prakash Ambedkar_Rahul Gandhi
Prakash Ambedkar_Rahul Gandhi

मुंबई : एकीकडं जागा वाटपावरुन वंचितनं महाविकास आघाडीच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. तर दुसरीकडं प्रकाश आंबेडकर हे उद्या मुंबईत होणार असलेल्या राहुल गांधींच्या न्याय यात्रेच्या समारोपाच्या सभेला हजेरी लावणार आहेत. स्वतः आंबेडकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. (Prakash Ambedkar will attend Rahul Gandhi Bharat Jodo Nyaya Yatra ending rally at Shivaji Park Mumbai)

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

प्रकाश आंबेडकर म्हणाले, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप समारंभाला उपस्थिती लावण्यासाठी पाठवलेल निमंत्रण मला मिळालं आहे. त्यांचं हे निमंत्रण मी काल स्विकारलं आहे. त्यामुळं मी १७ मार्च रोजी शिवाजी पार्क इथं होणाऱ्या या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, उद्याच मी मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांना आमच्या राजगृह या निवासस्थानी जेवणाचं निमंत्रणही दिलं आहे, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com