Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

बारामती, पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी (ता. २९) सायंकाळी साडेपाच वाजता वानवडीतील रेसकोर्सच्या मैदानावर ‘महाविजय संकल्प सभा’ होणार आहे.
Pune Loksabha
Pune Loksabhasakal

पुणे : बारामती, पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी (ता. २९) सायंकाळी साडेपाच वाजता वानवडीतील रेसकोर्सच्या मैदानावर ‘महाविजय संकल्प सभा’ होणार आहे. यासाठी चारही मतदारसंघांतून सुमारे दोन लाख नागरिक उपस्थित राहतील, त्या अनुषंगाने महायुतीतील सर्व घटक पक्षांनी तयारी सुरू केली आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Pune Loksabha
Pune News : शिखरे यांच्या चित्राची आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भूरळ

भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, शिवसनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे, सहसंपर्क प्रमुख संजय भोसले, मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, रिपाइंचे शहराध्यक्ष संजय सोनावणे, पुणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, महायुती समन्वयक संदीप खर्डेकर, राजेंद्र शिळीमकर आदी उपस्थित होते. पांडे म्हणाले, ‘‘रेसकोर्सच्या १२८ एकर मैदानावर सभा होणार असून तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. नागरिकांच्या सोईसाठी २२ एलईडी स्क्रीन लावल्या जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, रिपाइं पक्षांतर्फे सभेच्या नियोजनाच्या बैठका सुरू आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व २१ विधानसभा मतदारसंघातून सभेसाठी कार्यकर्ते येणार आहेत.’’

योगी, गडकरींच्याही सभा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची वडगाव शेरी मतदारसंघात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कोथरूड, शिवाजीनगरमध्ये, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पर्वती, कसबा मतदारसंघात सभा होण्याची शक्यता आहे, असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

अशी आहे व्यवस्था

  • आठ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था

  • सभास्थळी पाण्याची व्यवस्था

  • सभेसाठी दुपारी साडेचारपूर्वी उपस्थित राहण्याचे आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com