Pune News : शिखरे यांच्या चित्राची आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भूरळ

जागतिक कला दिनानिमित्त कलाकार संघाने ऑनलाईन कला प्रदर्शनाचे आयोजन केले होते.
Bhaguji Shikare Portrait The Lord Krishna presented at the International Photo Exhibition marathi news
Bhaguji Shikare Portrait The Lord Krishna presented at the International Photo Exhibition marathi news

हडपसर, ता. २७ : मध्यप्रदेशातील भारतीय कलाकार संघाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शनात येथील भागूजी शिखरे यांच्या 'द लॉर्ड कृष्णा' या चित्राची प्रेक्षकांना भूरळ पडली. या प्रदर्शनासाठी महाराष्ट्रातून निवड झालेले हे एकमेव चित्र आहे.

जागतिक कला दिनानिमित्त कलाकार संघाने ऑनलाईन कला प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्यामध्ये देशाच्या विविध भागातून चित्रकारांनी आपली चित्रे पाठवली होती. महाराष्ट्रातूनही काही चित्रे आली होती. त्यातून बत्तीस चित्रांची प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली होती. भागूजी शिखरे यांनी पाठवलेल्या 'द लॉर्ड कृष्णा' या चित्राचाही यामध्ये समावेश होता.

Bhaguji Shikare Portrait The Lord Krishna presented at the International Photo Exhibition marathi news
Lok Sabha Election 2024 : भिवंडीत ‘तुतारी’ला सूर गवसेना; मित्रपक्षाच्या ‘हाता’ने वाढवली डोकेदुखी

चित्रकार शिखरे यांनी ॲक्रेलिक रंगाच्या माध्यमातून ३ बाय ४ फूट आकाराचे हे चित्र रेखाटले आहे. कृष्णाच्या व्यक्तीमत्वाला साजेशी रंगसंगती केली आहे. चित्राची पोजही इतर कृष्ण चित्रा पेक्षा वेगळी आहे. त्यामुळे या चित्राचे प्रदर्शनात मोठे कौतुक झाले. शिखरे हे एका माध्यमिक विद्यालयातून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना यापूर्वी राज्यस्तरीय, राष्ट्रीय 'आदर्श कलाशिक्षक पुरस्कार' मिळाले आहेत.

Bhaguji Shikare Portrait The Lord Krishna presented at the International Photo Exhibition marathi news
MPSC News : कर सहाय्यकाच्या पात्रता यादीवर उमेदवारांचा आक्षेप; त्रुटींमुळे अपात्र उमेदवार कौशल्य चाचणीसाठी पात्र?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com