Loksabha Election 2024 : राहुल गांधींनी चाखली मोहाच्या फुलांची चव

सध्या मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी येथील उमरिया खेड्यामध्ये मोहाची फुले गोळा करणाऱ्या महिलांशी आज संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024sakal

नवी दिल्ली : सध्या मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी येथील उमरिया खेड्यामध्ये मोहाची फुले गोळा करणाऱ्या महिलांशी आज संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

मोहाच्या फुलांची चव चाखल्यानंतर ‘नॉट बॅड’ असे सहज उद्‍गार त्यांच्या तोंडून बाहेर पडले. मध्य प्रदेशातील घनदाट जंगलांमध्ये मोहाची झाडे आढळून येतात. येथील स्थानिक आदिवासी समुदायाची रोजीरोटीही त्यावरच अवलंबून आहे. मध्य प्रदेशातील मांडला आणि सेऊनी या जिल्ह्यांमध्ये राहुल गांधी यांच्या सभा पार पडल्या.

मंगळवारी सकाळी उमरियाच्या दिशेने जाताना राहुल यांनी मोहाची फुले गोळा करणाऱ्या आदिवासी महिलांशी संवाद साधला. ही फुले गोळा करताना महिलांना नेमका कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो?

Loksabha Election 2024
Randeep Surjewala : खासदार सुरजेवाला यांना निवडणूक आयोगाची नोटीस

सरकारकडून त्यांना मदत मिळते की नाही? आदी प्रश्नांची उत्तरे त्यांनी जाणून घेतली. या महिलांशी बराच वेळ चर्चा केल्यानंतर ते पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले. प्रतिकूल हवामानामुळे सोमवारी राहुल यांच्या हेलिकॉप्टरच्या उड्डाणात अडथळे आले होते त्यामुळे रात्रभर त्यांना येथेच अडकून पडावे लागले होते. पोलिसांनी मात्र राहुल यांच्या हेलिकॉप्टरला इंधनाचा पुरवठा करणाऱ्या टँकरला विलंब झाल्याने त्यांना येथेच अडकून पडावे लागल्याचे नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com