Sangli Loksabha :‘सांगली’ची निवडणूक भाजप विरुद्ध विशाल ; काँग्रेस पक्ष कारवाई करणार नसल्याचा विशाल पाटलांचा दावा

‘‘माझा लढा काँग्रेस पक्षासाठी, कार्यकर्त्यांसाठी, सांगलीच्या अस्मितेसाठी आहे. या संकटातून पळ काढूच शकत नव्हतो. लोकांनीच ठरवले, मी लढले पाहिजे. काँग्रेसची लढाई लढत असताना पक्ष माझ्यावर कारवाई करेल, असे वाटत नाही,’
Sangli Loksabha Constituency
Sangli Loksabha Constituencysakal

सांगली : ‘‘माझा लढा काँग्रेस पक्षासाठी, कार्यकर्त्यांसाठी, सांगलीच्या अस्मितेसाठी आहे. या संकटातून पळ काढूच शकत नव्हतो. लोकांनीच ठरवले, मी लढले पाहिजे. काँग्रेसची लढाई लढत असताना पक्ष माझ्यावर कारवाई करेल, असे वाटत नाही,’’ अशी भूमिका अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी आज येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

विशाल पाटील म्हणाले, ‘‘सध्या भाजप आणि शिवसेनेच्या व्यासपीठावर असलेल्या लोकांनी त्यांचा उमेदवार नकोय, मात्र नाईलाज म्हणून ते काम करत आहेत,’’ असा टोला त्यांनी लगावला. ते म्हणाले, ‘‘अत्यंत वाईट पद्धतीने दबाव टाकून शिवसेना उमेदवारी पटकावण्यात यशस्वी झाली, मात्र वस्तुस्थिती लक्षात घ्या.

Sangli Loksabha Constituency
Lok Sabha Election 2024 : सुरतमधील काँग्रेसचे लोकसभा उमेदवारावर पक्षाची कारवाई! सहा वर्षांसाठी केलं निलंबित

‘सांगली’ची निवडणूक भाजप विरुद्ध विशाल अशीच होतेय. विश्‍वजित कदम यांनी पाठीशी राहण्याचा निर्णय एक-दोन वर्षांपासून घेतला. त्यांचा अपमान या सर्व प्रक्रियेत झाला. त्यांना त्रास सहन करावा लागला. ती भावना काल त्यांच्या भाषणातून पुढे आली. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. कार्यकर्ते संतप्त आहेत, मात्र ते काँग्रेसवर राग काढणार नाहीत, ते मतपेटीत राग काढतील.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com