Sangli Lok Sabha Politics : ना-ना करते प्‍यार तुम्हीसे कर बैठे

नानांनी संतापाच्या सुरात कारच्या ड्रायव्हरला गाणे बदलण्याचा आदेश झाडला...
Sangli Lok Sabha Politics
Sangli Lok Sabha Politicsesakal
Summary

ड्रायव्हरने गरकन् स्टेअरिंग वळवलं. गाडी पेठ नाक्यापासून इस्लामपूरच्या दिशेनं लागली... तसं नानांच्या तोंडून आपसूक वाक्य फुटलं, ‘‘मी काही केलंच नाही,’ म्हणून या गड्यानं हात वर केला.

Sangli Lok Sabha : ‘ना-ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे... करना था इनकार, मगर इकरार, तुम्हीसे कर बैठे... ना-ना करते...’ ‘‘ए लेका बंद कर ते गाणे... माझी अवस्था तशीच झालीय बघ... ‘आम्ही सांगली सोडणार नाही,’ म्हणता-म्हणता आता सांगलीतली काँग्रेसच (Congress) मला सोडून जाईल की काय, अशी अवस्था करून ठेवलीय. ‘ना-ना करत मला मशालीत तेल घालायला तिकडं जायला लागतंय...’’ नानांनी संतापाच्या सुरात कारच्या ड्रायव्हरला गाणे बदलण्याचा आदेश झाडला... ‘‘मी प्रदेशचा अध्यक्ष असून काही चालेना लेका... निदान तू गाणे तरी बदल... तेवढा तरी मान ठेवशीला का नाही...?’’ नाना वैतागले.

ड्रायव्हर मनातल्या मनात हसला अन् त्यानं दुसरे गाणे प्ले केलं... ‘जितने भी तू करले सितम... हस-हस के सहेंगे हम, ए प्यार ना होगा कम... सनम तेरी कसम...’ नानांना आता चीड आली... ‘‘परवाच विशाल पाटलांनी (Vishal Patil) सभेत हे गाणं म्हटलं होतं - ‘लाईव्ह’... मुंबईत ऐकायला आलं, कानात घुमलं... आता मी काय कमी प्रयत्न केला का? किती आदळआपट केली... चेन्नीथला, वेणुगोपाल, खर्गेसाहेब सगळ्यांना सांगितलं ना बे... त्या राऊतांना केवढा अंगावर घेतला, त्याला कोण डिवचत नाही... मी घेतला ना वाईटपणा... तिकडं ठाकरे, इकडं पवार, आपला जीव लहान पडतो रे... पक्ष मोठा असून उपयोग काय? या लोकांना सहानुभूती हाय ना, आपल्याला ती कवा मिळेल देव जाणं.’’

Sangli Lok Sabha Politics
Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीचा निकाल सांगा आणि 21 लाख रुपये जिंका; 'अंनिस'चे ज्योतिषाचार्यांना आव्हान

ड्रायव्हरने गरकन् स्टेअरिंग वळवलं. गाडी पेठ नाक्यापासून इस्लामपूरच्या दिशेनं लागली... तसं नानांच्या तोंडून आपसूक वाक्य फुटलं, ‘‘मी काही केलंच नाही,’ म्हणून या गड्यानं हात वर केला. आता निस्तरतोय आम्ही...’’ वाक्य पूर्ण व्हायच्या आत नानांनी दुसरं वाक्य उच्चारलं, ‘‘ड्रायव्हर, इथनं औदुंबरचा शॉर्ट कट हाय का बघा. दत्ताचं दर्शन घेऊ, डोहात एक डुबकी मारू अन् मग सांगलीच्या दिशेने पुढं जाऊ.’’ मागं बसलेल्या पी. ए.नं आठवण करून दिली, ‘‘साहेब, कालच विशालदादानं इथं नारळ फोडलाय... डोहाचं म्हणाल तर यंदा तो स्वच्छ अन् शांत हाय. या डोहात यंदा कुठल्याच पक्षानं वाद डुबवला नाही. वाद नव्हताच, असा आव आणत सगळे एकमेकांचा ‘कार्यक्रम’ करायला तयार झालेत. आपल्या पक्षातली पण अन् तिकडची पण...’’

Sangli Lok Sabha Politics
Sangli Lok Sabha : 'मशाल' पेलायला 'हात' मिळणार का? विशाल पाटलांच्या बंडखोरीने शिवसेना चिंतेत

नाना म्हणाले, ‘‘असू दे लेका, चल औदुंबरला... बाळासाहेबांना कळव, तिथं येऊन थांबा म्हणावं... दत्ताच्या मनात काय हाय ते कळणार नाही, पण बाळासाहेबांच्या मनात काय खळबळ चालू हाय ते आधी समजून घेऊ...’’ नानांची गाडी औदुंबरला येऊन थांबली. दर्शन झालं... बाळासाहेब अन् ते एका गाडीत बसले... काच बंद झाली... आत चर्चा सुरू झाली... ती काही बाहेर ऐकायला आली नाही...

पाचवा मैल मागं सोडून गाडीनं सांगलीचा रस्ता धरला. ‘‘आज फैसला करायचा... त्याला ठेवायचा की, काढायचा... धरायचा की, सोडायचा... मशाल की, विशाल... दिवसा मशाल अन् रात्री विशाल की, दोन्ही टाईमाला मशाल... लई किचकट करून ठेवली राव तुम्ही सांगली...’’ नानांच्या कपाळावर डझनभर आट्या पडल्या. गाडी थांबली... समोरून कऱ्हाडकर बाबा गाडीतनं उतरलं... त्याच गाडीतनं नगरकर बाळासाहेब उतरले... नानांनी दोघांना बाजूला घेतलं... ‘‘काय करावं विशालचं?’’

Sangli Lok Sabha Politics
Raigad Lok Sabha : कट्टर मुस्लीम शिवसैनिकांचं गाव! रायगडचं राजकारण 'या' गावातूनच चालतं...

नानांनी सवाल केला... दोघं एका सुरात म्हणाले, ‘‘नाना तो अधिकार तुमचा, तो मान तुमचा.’’ आता नानांनी डोक्याला हात लावला, तोवर त्यांच्याच गाडीत गाणं वाजायला लागलं, ‘‘क्या करे, क्या ना करे, ए कैसी मुश्‍किल हाय, कोई तो बता दे इसका हल ओ मेरे भाय...’’ ड्रायव्हरनं रिव्हर्स गिअर टाकला अन् गाडी मागं सरकू लागली... तसं नानांना वाटून गेलं, ‘आपणासही रिव्हर्स गिअर असता तर बरं झालं असतं. विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या दिवसांपर्यंत मागे जाऊन तो निर्णय बदलला असता... ना सरकार पडलं असतं, ना एवढा गोंधळ झाला असता.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com