Sanjay Raut : मोदी हा चेहरा नाही, तर भुताटकी ; पुढील सरकार कोणाचे हे जनता ठरवेल

‘‘पंतप्रधानपदासाठी आमच्याकडे नरेंद्र मोदींचा चेहरा आहे, विरोधकांकडे काय आहे? असा प्रश्‍न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत. पण, मोदींचा चेहरा एवढा भयंकर आहे की, लोक घाबरत आहेत.
Sanjay Raut
Sanjay Rautsakal

छत्रपती संभाजीनगर : ‘‘पंतप्रधानपदासाठी आमच्याकडे नरेंद्र मोदींचा चेहरा आहे, विरोधकांकडे काय आहे? असा प्रश्‍न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत. पण, मोदींचा चेहरा एवढा भयंकर आहे की, लोक घाबरत आहेत. मोदी हा चेहरा नाही, ती भुताटकी आहे. ही भुताटकी आगामी निवडणुकीत उतरवायची आहे. ते पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे,’’ अशी टीका शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी शनिवारी केली.

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या समर्थनगर येथील प्रचार कार्यालयाचे शनिवारी संजय राऊत यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. यावेळी राऊत यांनी भाजपवर चौफेर टीका केली. ते म्हणाले, ‘‘नरेंद्र मोदी यांचा चेहरा म्हणजे, शोले चित्रपटातील ‘सो जा बच्चे नही तो गब्बर आ जायेगा,’ असे झाले आहे. मोदी कधी टीव्हीवर येतील आणि काय घोषणा करतील? या दहशतीखाली लोक आहेत.’’ ‘अब की बार ४०० पार’चा समाचार घेताना राऊत यांनी, ‘‘लोकशाही तुमच्या बापाची आहे का? या देशातील जनताच ठरवेल, सरकार कोणाचे?’’ असा टोलाही त्यांनी लगावला.

Sanjay Raut
Rahul Gandhi : हे सरकार जनतेचे नव्हे, अदानींचे ; साकोलीतील सभेतून राहुल यांचा घणाघात,शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचीही ग्वाही

प्रचाराचा मुद्दा आहे?

‘‘गेली दहा वर्षे तुम्ही काम करत आहात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का? बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले का? तुम्ही कोणती विकासकामे केली? हे मुद्दे मांडा. पण, विरोधक श्रावण महिन्यात मटण खातात, असा आरोप आमचे पंतप्रधान करीत आहेत. हा प्रचाराचा मुद्दा आहे का,’’असा प्रश्न राऊत यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com