Lok Sabha Election : प्रचारासाठी पक्षांचा हायटेक फंडा

Maharashtra Election : एलईडी स्क्रीन, आकर्षक स्टिकरद्वारे वातावरण निर्मिती; नियोजनही एजन्सींकडे
मतदारसंघातील नाक्या-नाक्यावर, चौकात, गल्लीत एलईडी स्क्रीन व्हॅनद्वारे शॉर्ट फिल्म, रील्स दाखवून वातावरण निर्मिती केली जात आहे.
मतदारसंघातील नाक्या-नाक्यावर, चौकात, गल्लीत एलईडी स्क्रीन व्हॅनद्वारे शॉर्ट फिल्म, रील्स दाखवून वातावरण निर्मिती केली जात आहे. esakal

Voting Poll 2024 : लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला असून कमी वेळेत लाखो मतदारांपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी हायटेक प्रचाराचा फंडा अवलंबला आहे. मतदारसंघातील नाक्या-नाक्यावर, चौकात, गल्लीत एलईडी स्क्रीन व्हॅनद्वारे शॉर्ट फिल्म, रील्स दाखवून वातावरण निर्मिती केली जात आहे. तसेच यंदा सोशल मीडियाचा वापर करून उमेदवार मतदारापर्यंत म्हणणे पोहोचवत आहेत.

मतदारसंघातील नाक्या-नाक्यावर, चौकात, गल्लीत एलईडी स्क्रीन व्हॅनद्वारे शॉर्ट फिल्म, रील्स दाखवून वातावरण निर्मिती केली जात आहे.
Lok Sabha Election : घारापुरी मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांचा बोटीतून प्रवास

मुंबईत छोट्या वाहनांमध्ये एलईडी स्क्रीन लावून उमेदवारांचे, नेत्यांची भाषणे ऐकवली जात आहेत. चार रॅलीतील गर्दी, भाषणाचा एक-दीड मिनिटाचा भाग व्हिडीओ, रील्सच्या माध्यमातून दाखवून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. यंदा पहिल्यांदाच एलईडी स्क्रीन असलेले ऑडिओ, व्हिडीओ पोर्टेबल युनिट आपल्या गळ्यात घालून कार्यकर्ते गल्लीबोळात फिरताना दिसत आहेत.

यंदा जवळपास सर्वच मुख्य राजकीय पक्षांनी आपल्या निवडणूक व्यवस्थापनासाठी बड्या एजन्सींना नियुक्त केले आहे. या कंपन्या उमेदवार निवडीसाठीचे सर्वेक्षण, मतदारांचा कल ते प्रत्यक्ष प्रचाराचे काम करतात. या अंतर्गत प्रचार, बूथ व्यवस्थापनावर लक्ष ठेवण्यासाठी सर्वच पक्षांच्या वॉर रूम सुरू आहेत. तसेच ऑनलाईन गूगल फॉर्मचा वापर केला जात आहे.

आमचे चिन्ह नवे आहे. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडल, फेसबुक पेजवरून गाण्यांच्या माध्यमातून आमचे चिन्ह ठसवत आहे. तसेच रील्स, फोटो, शॉर्ट व्हिडीओच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे. मशाल चिन्ह घराघरात, मनामनात पोहोचण्यासाठी सोशल मीडियावर डीपी ठेवत आहोत.

- साईनाथ दुर्गे, सचिव,

शिवसेना (ठाकरे गट)

मतदारसंघातील नाक्या-नाक्यावर, चौकात, गल्लीत एलईडी स्क्रीन व्हॅनद्वारे शॉर्ट फिल्म, रील्स दाखवून वातावरण निर्मिती केली जात आहे.
Loksabha election : निवडणूक किस्सा! अमिताभ बच्चन उमेदवार अन् लिपस्टिकच्या खुणा असलेल्या चार हजार मतपत्रिका...

राज्यातील १२ कोटी लोकसंख्येपैकी आठ कोटी लोक कोणत्या ना कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेसकडून सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. त्यासाठी मुंबईत १०० कार्यकर्त्यांची वॉर रूम तयार केली असून त्यामध्ये कंटेंट क्रिएटर, व्हिडीओ एडिटर, कन्टेंट मॅनेजर अशी टीम कार्यरत आहे. मात्र, आम्ही केवळ खरा कन्टेंट लोकांपर्यंत पोहोचत आहे.

- विशाल मुत्तेमवार, सोशल मीडिया अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस

केंद्र आणि राज्य

सरकारने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रचारात एलईडी व्हॅनचा वापर करत आहोत. सोशल मीडियावर वॉरियर, सुपर वॉरियर कार्यरत आहेत. तसेच कार्यकर्त्यांचे व्हॉट्सअॅप ग्रुप असून त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे.

- नवनाथ बन, भाजप माध्यम प्रमुख, महाराष्ट्र प्रदेश

सोशल मीडिया आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे अल्पावधीतच प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपला अजेंडा पोहोचत असल्याने सर्वच पक्ष त्याचा वापर करू लागले आहेत. यातील बहुतांश कन्टेंट हा खोटा आहे. त्यामुळे खरे काय, खोटे काय हे ठरवणे हे मोठे आव्हान आहे.

- सूरज पाटील,

सोशल मीडियातज्ज्ञ

फ्लोरोसंट कलरमधील प्रचार साहित्य

प्रचार रॅलीदरम्यान उमेदवाराचे निवडणूक चिन्ह असलेले फ्लोरोसंट कलरमधील स्टिकर, मास्क, टोप्या, पेनचा वापर केला जात आहे. रात्रीच्या अंधारात याचा प्रभावी वापर उमेदवारांकडून होत आहे.

डिप फेकचा वापर

यंदा सर्वच पक्षांकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला आहे. कधीकाळी केवळ भाजपची पकड असलेला या समाज माध्यमांत सर्व पक्षांनी शिरकाव केला आहे. राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट भाजपबरोबरीने या तंत्राचा वापर करत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

इन्स्टाग्राम प्रभावी

गेल्या निवडणुकीत एवढे इन्स्टाग्राम एवढे प्रभावी नव्हते. यावेळी मात्र इन्स्टाग्रामचा प्रभाव वाढला आहे. कारण तरुणाई इन्टाग्रामला जास्त फॉलो करते. त्यामुळे ट्विटर, फेसबुकपेक्षा इन्टाग्राम रील्स, व्हिडीओ पोस्ट केले तर त्याला तुफान रिच मिळते. लोकांना काही वेळात १० ते १५ रील्स म्हणजे वेगवेगळे कन्टेंट बघता येते. त्यामुळे यंदा सर्वच पक्ष, उमेदवार इन्स्टाग्रामचा प्रभावी वापर करून तरुण मतदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.

मतदारसंघातील नाक्या-नाक्यावर, चौकात, गल्लीत एलईडी स्क्रीन व्हॅनद्वारे शॉर्ट फिल्म, रील्स दाखवून वातावरण निर्मिती केली जात आहे.
Maharashtra Lok Sabha 2024 phase 4 Election Voting LIVE : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; संभाजीनगर-वडगाव शेरीमध्ये नागरिक खोळंबले

अपप्रचार धोकादायक

वेगवेगळ्या पक्षांकडून आपल्या सोयीचा कन्टेंट सोशल मीडियावर टाकला जात आहे. अनेकदा व्हिडीओ मोडून-तोडून दाखवले जात आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचा प्रभाव असलेले मतदार, व्यक्ती केवळ जुजबी माहितीवरून एखाद्याबाबत आपले मत तयार करतो. त्याच्या मनात संबंधिताची तीच इमेज तयार होते. त्यामुळे समाजात नकारात्मकता वाढत चालली आहे. सोशल मीडियावर टाकलेला व्हिडीओ वर्षानुवर्षे तेथे राहणार आहे. त्यामुळे आज टाकलेल्या व्हिडीओतून दहा वर्षांनंतरही त्या व्यक्ती, पक्षाबाबत अपप्रचार होणार आहे. हे समाजासाठी धोकादायक असल्याचे माध्यम तज्ज्ञ सांगतात.

रोजगारनिर्मिती

सोशल मीडिया क्षेत्राकडे रोजगार निर्मितीचे क्षेत्र म्हणून बघितले जात नव्हते. मात्र, अलीकडे सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. काही मिनिटात लाखो लोकापर्यंत जाता येते. त्यामुळे वॉर रूम, सोशल मीडिया हँडल करणे, यासाठी शेकडो तरुण दिवसरात्र कार्यरत आहेत. या माध्यमातून हजारो तरुणांना हाताला काम मिळाल्याचे माध्यम तज्ज्ञ सांगतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com