Loksabha Election : उल्हासनगरातील सोनिया धामी यांना राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीत महत्वाचे स्थान

अखंड राष्ट्रवादीच्या काळात सोनिया धामी यांनी उल्हासनगरच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी हाताळताना पक्ष वाढवण्यासाठी व विकासकामे मार्गी लावण्याकरिताची मोलाची जबाबदारी पार पाडली होती
Loksabha Election
Loksabha Election sakal

उल्हासनगर : अखंड राष्ट्रवादीच्या काळात सोनिया धामी यांनी उल्हासनगरच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी हाताळताना पक्ष वाढवण्यासाठी व विकासकामे मार्गी लावण्याकरिताची मोलाची जबाबदारी पार पाडली होती.त्याची पोचपावती म्हणून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने सोनिया धामी यांची सरचिटणीस पदी नियुक्ती करून त्यांना प्रदेश कार्यकरिणीत महत्वाचे स्थान दिले आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सोनिया धामी यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे.राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोनिया धामी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची सर्व ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी पक्षाला आपले सहकार्य राहील असा मला विश्वास असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियुक्तीपत्रात नमूद केले आहे.यावेळी उल्हासनगर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री,पदाधिकारी प्रवीण खरात,शंकर धावानी उपस्थित होते.

Loksabha Election
Narendra Modi : अण्वस्त्रे नष्ट करण्याची विरोधकांची इच्छा ; बारमेरमध्ये पंतप्रधानांची टीका,देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादीचे भारत गंगोत्री,सोनिया धामी यांनी कोरोनाच्या काळात नागरिकांची,गोरगरिबांची सेवा केली होती.त्यानंतर सोनिया धामी यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली होती.पुढे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशी महाविकास आघाडी स्थापन होऊन सत्तापरिवर्तन झाले.उल्हासनगरात पॅनल 17 मध्ये राष्ट्रवादीचे चारच नगरसेवक होते.

अजित पवार हे महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्री झाल्यावर भारत गंगोत्री,सोनिया धामी यांनी अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्या निधीतून 25 कोटी रूपयांचा विकासनिधी आणला.त्यामुळे या पॅनलमध्ये काँक्रीटचे रस्ते,उद्याने विकसित झाले आहेत. नंतर राष्ट्रवादी दोन गटात विभागली गेल्यावर भारत गंगोत्री,सोनिया धामी हे अजित पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले आहेत.त्यामुळे भारत गंगोत्री यांची उल्हासनगर जिल्हाध्यक्ष व सोनिया धामी यांची प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती करून पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com