Sushma Andhare: मराठी माणसाच्या मुद्द्यावरुन सुषमा अंधारेंचं रेणुका शहाणेंना पत्र; म्हणाल्या, आक्रस्ताळेपणा करणाऱ्यांना...

मराठी माणसाच्या मुद्द्यावर रेणुका शहाणे यांनी नुकतीच सडेतोड आणि ठाम भूमिका घेतली आहे.
Sushma Andhare_Renuka Shahane
Sushma Andhare_Renuka Shahane

मुंबई : एका कंपनीतील एचआर मॅनेजरनं नोकर भारतीसाठी काढलेल्या पत्रात 'मराठी लोकांनी अर्ज करु नयेत' असा स्पष्ट उल्लेख केला होता. हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आणि युजर्सनं या बाईंना चांगलंच सुनावलं होतं. यानंतर संबंधित एचआरला जाहीर माफीही मागावी लागली.

यावर उलटसुलट चर्चा सुरु असताना आपल्या निर्भिड मतांसाठी ओळखल्या जाणाऱ्या वरिष्ठ अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं. मराठी माणसांचा द्वेष करणाऱ्यांना लोकांचं समर्थन करणाऱ्या पक्षाला किंवा त्यांच्या उमेदवाराला मत देऊ नका आणि त्यांना शांतपणे आपली चूक दाखवून द्या, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या भूमिकेची प्रशंसा करणारं पत्र आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लिहिलं आहे. (Sushma Andhare letter to Renuka Shahane on issue of Marathi man)

अंधारेंनी पत्रात काय म्हटलं?

प्रिय रेणुका ताई

सस्नेह नमस्कार

आपण प्रत्यक्षात कधी भेटलो नाहीय. परंतु तुमच्या हसतमुख अभिनयाची मी प्रचंड चाहती आहे. सुरभी मालिकेपासून ते रिटा सारख्या अनेक चरित्र चित्रपटातल्या आपल्या भूमिका या मानवी मनाचे विविध कंगोरे दाखवणाऱ्या आहेत. आपला सशक्त अभिनय बघताना आपल्या संवेदनशील मनाची आणि आपल्या प्रगल्भतेची सुद्धा जाणीव माझ्यासारख्या प्रेक्षकाला सातत्याने होत राहते. "मराठी पिपल आर नॉट वेलकम" या मुद्द्यावर आपण घेतलेली भूमिका प्रशंसनीय आहे. (Latest Marathi News)

Sushma Andhare_Renuka Shahane
Rohit Vemula: "आरोपींना शिक्षा होणारच!" रोहित वेमुला मृत्यूप्रकरणी CM रेवंथ रेड्डींचा इशारा

ज्या महाराष्ट्राच्या फिल्म इंडस्ट्रीने मराठीच नाही तर विविध प्रांतातून आलेल्या अनेक कलाकारांना कलेची दालनं नुसती खुली करून दिली नाही तर त्या सगळ्या जात धर्म आणि प्रांतांच्या कलाकारांना या मायानगरीने सामावून घेतलं. आदरातिथ्य केलं.. अनेकांच्या कित्येक पिढ्या खुशहाल झाल्या. त्या मायमराठी बद्दल या चंदेरी नगरातील आपल्यासारखी एक संवेदनशील अभिनेत्री अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन आपलं म्हणणं ठामपणे मांडते.

यासाठी आपलं मनःपूर्वक अभिनंदन..!!

ताई आपण जितक्या ठामपणे भूमिका मांडली त्यानंतर त्यावर राजकीय किंतु परंतु करत निव्वळ आणि निव्वळ आपल्या अस्तित्वाची लढाई म्हणून आक्रस्ताळेपणा करणाऱ्या काही प्रतिक्रिया येतीलच. पण त्याकडे दुर्लक्ष करण्याइतकी प्रगल्भता आपल्याकडे आहे. हे वेगळे सांगायला नको. पण ज्यांनी आक्रस्ताळेपणा केला किंवा आपल्या हेतूविषयी शंका व्यक्त केली तीच माणसं कोविडच्या काळामध्ये जेव्हा माणूस माणसाला ओळखत नव्हता. रक्ताची नाती या महाभयंकर आजारापुढे कमकुवत ठरत होती. अशा काळात महाराष्ट्राच्या फक्त महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलं की सगळ्यात चांगलं काम हे महाराष्ट्र मुंबई विशेषता लोकसंख्येची सर्वाधिक घनता असणाऱ्या धारावी पॅटर्नमध्ये झालं. धारावी पॅटर्न मध्ये राहणारे लोक फक्त मराठी नाही ते भारतभरातून धारावी मध्ये स्थायिक झालेले विविध जाती धर्माचे भाषेचे आणि प्रांताचे लोक आहेत ज्यांची काळजी कुटुंबप्रमुख म्हणून तात्कालीन मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. पण हे अशा आक्रस्ताळ्या लोकांना कळणार नाही.

Sushma Andhare_Renuka Shahane
Amit Shah: भाजप जिंकल्यास मुस्लिम आरक्षण रद्द करुन SC-ST-OBC ना देऊ - अमित शाह

यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव ठाकरे यांचा उल्लेख अत्यंत गौरवपूर्ण आहे. पण निव्वळ इतरांना ब्लॅकमेलिंग करण्यासाठी लेडी सोमय्या बनत जे गलिच्छ आरोप करणारे लोक आहेत ते आजही या प्रश्नाचे उत्तर देत नाही की, कोविडच्या काळामध्ये एकीकडे भाजपशासित राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेश मध्ये प्रेतं नदीवर तरंगत होती, गुजरात मध्ये प्रेतं रस्त्यावर जाळली जात होती. अशा काळामध्ये महाराष्ट्र एक असं राज्य ठरलं ज्या राज्यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्मांच्या मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार त्या त्या जाती-धर्माच्या इतमामात झाले. (Marathi Tajya Batmya)

या महाभयंकर महामारीच्या काळात राजकारण बाजूला ठेवत माणुसकी म्हणून सगळ्यांनी एकत्र येणं अपेक्षित होतं. पण भारतीय जनता पार्टीचे नेते हे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत करण्याऐवजी पीएम केअर फंड मध्ये पैसे टाका असे अत्यंत निर्लज्जपणे सांगत होते. या पीएम केअर फंड बद्दल माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आता माहिती मागितली असता हा फंड खाजगी होता असे उघड झाले. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रातल्या लोकांच्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी निधी न देता तो बाहेर पोहोचवणारे हे लोक खरंच यांना इतरांना प्रश्न विचारण्याचे अधिकार मिळतात का?

Sushma Andhare_Renuka Shahane
Arvind Kejriwal: EDचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र; केजरीवालांना जामीन का देऊ नये? दिली यादी

ज्या मुद्द्यांना घेऊन आक्रस्ताळेपणा केला जातोय त्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे आयुक्त शहर जे सध्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या तैनातीमध्ये आहेत दुसरे तात्कालीन आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले किँवा तात्कालीन स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव हे सत्ताधाऱ्यांच्या गोटात आहेत. विशेष स्थायी समिती ज्यांच्याकडे होती ते यशवंत जाधव यामिनी जाधव कुटुंब.. ज्यांच्यावर ढिगाने आरोप व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्यांनी केले त्यांना आता निवडणूक प्रचारात उतरवणारे लोक यांना खरंच मराठीच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्याचा नेतिक अधिकार प्राप्त होतो का? (Entertainment News in Marathi)

Sushma Andhare_Renuka Shahane
Firecracker Factory Blast: शिवकाशीजवळ फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू

असो, आपल्यासारख्या अभिनय क्षेत्रातल्या गुणी अभिनेत्रीला मात्र या सगळ्या राजकारणात कुणीही ओढू नये असे फार मनापासून वाटते. या निर्बुद्ध लोकांना याचीही कल्पना नाही की मध्य प्रदेशमध्ये जन्मलेल्या आणि पुढे हिंदी, कन्नड, तेलगू, तमिळ अशा विविध चित्रपटांमधून सशक्त अभिनयाची कारकीर्द गाजवणाऱ्या आशुतोष राणांच्या आपण अर्धांगिनी आहात. म्हणूनच नाईलाजाने कधी कधी आक्रस्ताळेपणा करणाऱ्या लोकांना उत्तर देणं अपरिहार्य ठरतं. कारण म्हातारी मेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो.

असो आपल्या भावी कारकीर्द आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा.

आपली सखी

प्रा . सुषमा अंधारे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com