Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 sakal

Loksabha Election 2024 : मतदानाचा ‘टक्का’ वाढविण्यासाठी सरसावले पक्ष

पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीत झालेली घसरण चिंताजनक असल्याने सर्व पक्षांनी दुसऱ्या टप्प्यासाठी कंबर कसली आहे. निवडणूक आयोगाने मतदानाचा टक्का वाढावा यासाठी केंद्रीय निरीक्षक मुंबईत पाठवले आहेत.

मुंबई : पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीत झालेली घसरण चिंताजनक असल्याने सर्व पक्षांनी दुसऱ्या टप्प्यासाठी कंबर कसली आहे. निवडणूक आयोगाने मतदानाचा टक्का वाढावा यासाठी केंद्रीय निरीक्षक मुंबईत पाठवले आहेत. मतदार बाहेरगावी जाऊ नये याची काळजी घेत असतानाच प्रशासनाने सदिच्छा दूत पाठवणे, मतदान हे कर्तव्य आहे सांगणारे मान्यवरांचे संदेश व्हायरल केले जाणार आहेत.

मुंबईतील मतदान हा कायम चिंतेचा विषय ठरला असतानाच २६ एप्रिल रोजी मतदानास सामोरे जाणाऱ्या प्रत्येक मतदारसंघातला टक्का कसा वाढवता येईल, याची काळजी घेणे सुरु झाले. भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रात पक्षाचे स्थान बळकट करण्याची लढाई लढणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी जोर लावला आहे.

भाजपने गेल्या काही महिन्यांपासून मतदारयादीतील प्रत्येक पानासाठी पदाधिकारी नेमले आहेत. १०० मतदारांची जबाबदारी घेतलेल्या या ‘पन्नाप्रमुखां’नी त्या त्या भागातील मतदानाकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. यासंदर्भात ज्येष्ठ नेते माधव भंडारी म्हणाले, ‘‘भाजपचे सर्व कार्यकर्ते मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सक्रिय आहेत. प्रत्येक जण त्याच्या क्षेत्रात मतदारांशी संपर्क साधण्याचे काम करत आहे. उन्हाची काहिली काहीशी कमी झाली असल्याने या टप्प्यात मतदार हवामानाचा बाऊ न करता बाहेर पडतील, अशी आशा आहे . शिवाय भाजपही मतदानाबाबत ताकद लावणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपच्या मतदारसंपर्क मोहिमेनुसार ते लढवत असलेल्या लोकसभा मतदारसंघात संपर्क सुरु ठेवला आहे.

दुसरीकडे घटनात्मक कर्तव्य करीत महाराष्ट्राचे भविष्य सक्षम हातात सोपवा, अशी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची भूमिका आहे. ती गावपातळीवर तसेच वस्तीवस्तीत पोचविण्यासाठी संपर्क सुरु आहे, असे महेश तपासे यांनी सांगितले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारयाद्यातील नागरिकांशी संपर्क सुरु ठेवला आहे. मतदार घराबाहेर येतील, अशी अपेक्षा उन्मेष पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 : शेतकरीकल्याणाला प्राधान्य ; कर्जमुक्तीचे उद्धव ठाकरेंचे वचन

युवासेनेची यंत्रणाही सक्रिय

पहिल्या टप्प्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा उमेदवार रिंगणात नव्हता. आता दुसऱ्या टप्प्यात या मतदारसंघात पक्षासाठी महत्वाचे असणारे मतदारसंघ ऐरणीवर आले आहेत.मतदानाचा टक्का वाढावा यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची यंत्रणा काम करत आहेच, शिवाय युवासेनेची यंत्रणा सक्रिय झाली असून त्यांच्यामार्फत टक्केवारी वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे प्रवक्ते हर्षल प्रधान म्हणाले ," आमचे युवा कार्यकर्ते हेच आमचे वॉरियर्स आहेत. समाजमाध्यमातून मतदानाचे आवाहन तसेच संपर्क यावर जोर देण्यात आला आहे. ‘लोकशाही वाचवण्यासाठी परिवर्तन करू’ यावर अभियानाचा भर आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात जनता मतदान करेल असा आम्हाला विश्वास आहे."

‘वंचित’चेही प्रयत्न सुरू

वंचित बहुजन विकास आघाडीनेही मतदान वाढावे यासाठी काम सुरु केले आहे. डॉ. प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.मतदानाचा टक्का वाढावा यासाठी पक्षाने सर्व मतदारसंघात संपर्क सुरु ठेवला आहे, असे सांगत प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले," बाहेरगावी गेलेल्या मतदारांशी संपर्क साधून त्यांना त्यांच्या मतदारसंघात येण्यासाठी कोणत्या रेल्वेगाडया आहेत, परतीचा प्रवास कसा होऊ शकतो हे सांगणे सुरु ठेवले आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com