Hatkanangale Lok Sabha
Hatkanangale Lok Sabhaesakal

Hatkanangale Lok Sabha : 'साखरपुडा झाला, पण लग्न जमलं नाही'; राजू शेट्टींबाबत काय म्हणाले सतेज पाटील?

हातकणंगलेच्या (Hatkanangale Lok Sabha) जागेबाबत खासदार संजय राऊत आणि शेट्टी यांची चर्चाही झाली होती.
Summary

लोकसभेच्या हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडीची मोठी ताकद आहे. त्यामुळे तिरंगी लढतीचा कोणाला फटका बसेल, हे आता सांगणे कठीण आहे.

कोल्हापूर : माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी महाविकास आघाडीसोबत यावे, अशी आमची प्रामाणिक भूमिका होती. लोकसभेची हातकणंगलेची जागा काँग्रेसला मिळाली असती तर आम्ही त्यांचा विचार केला असता. ही जागा आता शिवसेनेकडे आहे, असं आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी स्पष्ट केलं.

Hatkanangale Lok Sabha
Satara Lok Sabha : 'मला काहीही लपवायचं नाही, मी लोकसभा निवडणुकीला उभा राहणारच'; उदयनराजेंनी केलं स्पष्ट

हातकणंगलेच्या (Hatkanangale Lok Sabha) जागेबाबत खासदार संजय राऊत आणि शेट्टी यांची चर्चाही झाली होती. मात्र, साखरपुडा झाला. पण, लग्न जमलं नाही, अशी स्थिती झाली असल्याचे मिश्‍कील उत्तरही आमदार पाटील यांनी दिले.

Hatkanangale Lok Sabha
Jayant Patil : सत्यजित पाटलांची 'मशाल' जयंत पाटलांच्या हाती! हातकणंगलेत राष्ट्रवादीची जबाबदारी वाढली!

कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, लोकसभेच्या हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडीची मोठी ताकद आहे. त्यामुळे तिरंगी लढतीचा कोणाला फटका बसेल, हे आता सांगणे कठीण आहे. मात्र, आम्ही महाविकास आघाडी म्हणून हातकणंगलेत जोमाने काम करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com