J&K Vidhan Sabha Election: जम्मू-काश्मीरची विधानसभा निवडणूक का जाहीर झाली नाही? CEC राजीव कुमारांनी दिलं स्पष्टीकरण

केंद्रीय निवडणूक आयोगानं देशातील सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली आहे.
J&K Vidhan Sabha Election _ Rajeev Kumar
J&K Vidhan Sabha Election _ Rajeev Kumar

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगानं देशातील सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली आहे. यामध्ये चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकी कधी होणार याची देखील घोषणा यावेळी करण्यात आली. पण ज्या विधानसभा निवडणुकीकडं देशाचं लक्ष होतं त्या जम्मू आणि काश्मीरची निवडणूक मात्र जाहीर झाली नाही. याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरणही दिलं. (Why Jammu and Kashmir Vidhan Sabha election has not been announced CEC Rajeev Kumar explained)

जम्मू आणि विधानसभा का जाहीर केल्या नाहीत?

जम्मू आणि काश्मीरमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र न घेतल्याबद्दल स्पष्टीकरण देताना CEC राजीव कुमार यांनी सांगितलं की, "आम्ही नुकतीच श्रीनगर आणि जम्मूला भेट दिली यावेळी जम्मू-काश्मीर प्रशासनानं आम्हाला सांगितले की, जर राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घ्यायच्या असतील तर त्यासाठी अतिरिक्त

सुरक्षा व्यवस्थेची गरज भासेल त्याशिवाय एकाच वेळी दोन निवडणुका होऊ शकणार नाहीत. प्रत्येक विधानसभेसाठी अंदाजे 10 ते 12 उमेदवार असतील. म्हणजे अंदाजे 1,000 उमेदवार रिंगणात असतील. याचा अर्थ प्रत्येक उमेदवाराला योग्य सुरक्षा कवच दिलं जाणं आवश्यक आहे आणि त्यासाठी अतिरिक्त सैन्याची गरज पडेल. Election Briefs

J&K Vidhan Sabha Election _ Rajeev Kumar
EVM Allegations: अधुरी हसरते...! मुख्य निवडणूक आयुक्तांनी उलगडून सांगितलं EVM मशीनचं गणित

कधी घेणार निवडणूक?

त्यामुळं एकदा लोकसभा निवडणूक पार पाडली की लवकरात लवकर जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्यास निवडणूक आयोग कटिबद्ध आहे. लोकसभेची निवडणूक व्यवस्थीत पार पडल्यानंतर जेव्हा सुरक्षा दलं उपलब्ध असेल तेव्हा जम्मू आणि काश्मीरमध्ये आम्ही मतदान घेऊ असंही यावेळी स्पष्टीकरण देताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं" Education about Elections

विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

दरम्यान, आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार राज्यांच्या विधानसभांची मुदत जून २०२४ मध्ये संपणार आहे. त्यामुळं या राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जाहिर केला. यामध्ये जम्मू आणि काश्मीरची विधानसभा भंग झालेली आहे पण वर सांगितल्याप्रमाणं या ठिकाणी लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर निवडणूक घेण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com