उस्मानाबाद : शिवसेनेने हिसकावला किल्ला । Election Results 2019

सयाजी शेळके
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

उस्मानाबाद : उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या कैलास पाटील यांनी 13 हजार 467 एवढ्या मताधिक्‍याने बाजी मारली आहे. तर अपक्ष उमेदवार अजित पिंगळे यांनीही आपला करीष्मा दाखवित 20 हजाराच्या पुढे मते मिळविली. राष्ट्रवादीचे संजय निंबाळकर यांचा याठिकाणी पराभव झाला. 

क्लिक करा - असा उडवला एमआयएमचा धुव्वा

उस्मानाबाद : उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या कैलास पाटील यांनी 13 हजार 467 एवढ्या मताधिक्‍याने बाजी मारली आहे. तर अपक्ष उमेदवार अजित पिंगळे यांनीही आपला करीष्मा दाखवित 20 हजाराच्या पुढे मते मिळविली. राष्ट्रवादीचे संजय निंबाळकर यांचा याठिकाणी पराभव झाला. 

क्लिक करा - असा उडवला एमआयएमचा धुव्वा

शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गुरुवारी (ता. 24) सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. प्रथम टपाली मतदानाची मोजणी सुरू झाली. त्यांतर पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू झाली. पहिल्या फेरीत शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार अजित पिंगळे (चिन्ह शिट्टी) यांनी आघाडी घेतली. यामध्ये अजित पिंगळे यांना तीन हजार 510 मते मिळाली. तर शिवसेनेचे कैलास पाटील यांना दोन हजार 596, राष्ट्रवादीचे संजय निंबाळकर यांना एक हजार 733 मते मिळाली.

या फेरीमध्ये कळंब तालुक्‍यातील आथर्डी, पाथर्डी तसेच कळंब शहरातील काही भागाचा समावेश आहे. या भागात पिंगळे यांचे वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यामुळे पिंगळे दुसऱ्या फेरीपर्यंत आघाडीवर होते. तिसऱ्या फेरीपासून पिंगळे दुसऱ्या नंबरवर गेले. सहाव्या फेरीपर्यंत धनुष्यबाण आणि शिट्टीमध्ये रस्सीखेच सुरू होती. त्यानंतर शिट्टी पिढाडीवर गेली. सेनेचे पाटील यांची आघाडी कायम राहिली. तर दुसऱ्या क्रमांकावर निंबाळकरांचे घड्याळ आले.

प्रत्येक फेरीत पाचशे ते दिड हजार मतांनी सेनेच्या पाटील यांना आघाडी मिळत होती. कळंब तालुका संपेपर्यंत सेनेचे पाटील आघाडीवर होते. त्यानंतर उस्मानाबादच्या येडशी, ढोकी तसेच पळसप परिसरातील भागातूनही सेनेचे पाटील यांना थोडकी आघाडी राहिली. दरम्यान 21 व्या फेरीपासून शहरातील मतमोजणी सुरू झाली. शहरातील पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे निंबाळकर यांनी अडीच हजारांची आघाडी तोडली. मात्र पुढच्या फेरीत पुन्हा पाटील यांनी थोडकी आघाडी मिळविली.

शहराच्या ख्वाजानगर भागाची फेरी सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे निंबाळकर यांनी जास्तीची मते मिळवित आघाडी कमी केली. मात्र पुढील फेरीत पुन्हा पाटील यांनी आघाडी मिळवित विजयाकडे वाटचाल सुरू ठेवली. शहराच्या अखेरच्या टप्प्यातही सेनेच्या पाटील यांना आघाडी मिळाली. शिवाय उर्वरीत ग्रामीण भागात पुन्हा सेनेच्या पाटील यांनी आघाडी कायम ठेवीत विजय निश्‍चित केला. टपाली मतांमध्येही सेनेच्या पाटील यांना 912 तर निंबाळकर यांना 798 मते मिळाली. दरम्यान टपाली मतदासह सेनेच्या पाटील यांना 87 हजार 488 तर राष्ट्रवादीच्या निंबाळकर यांना 74 हजार 21 मते मिळाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election Osmanabad final result shivsena Kailas Patil won