लातूर : काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या अमित आणि धीरज या दोन्ही पुत्रांनी लातूर शहर आणि ग्रामीण मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला. विजयाचा टप्पा गाठल्यानंतर दोघांनीही बाभळगावातील विलासबागेत जाऊन विलासराव देशमुख यांच्या स्मृतिस्थळीला भेट दिली. वडिलांना विजय अर्पण करीत देशमुख पुत्रांनी प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी रवाना झाले.
अशी - राखली देशमुखांनी गढी

लातूर शहर मतदार संघातून अमित देशमुख यांना एक लाख ४ हजार ६६९ मते मिळवून विजय मिळवला. त्यांच्या विरोधात उभे ठाकलेले भाजपचे उमेदवार शैलेश लाहोटी यांना ६६,४५२ मते मिळाली. अंतिम निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. तर लातूर ग्रामीण मतदार संघातून धीरज देशमुख हे एक लाख १८ हजार २०८ मतांनी विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार सचिन देशमुख यांना १३ हजार ११३ मते मिळाली.
त्याचवेळी अहमदपुरात - क्लिक करा
विजय निश्चित असल्याचे पाहून अमित आणि धीरज दोघेही सायंकाळी पाच वाजता घराबाहेर पडले. या वेळी बाभळगावातील त्यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला. पुष्पगुच्छ अन् शुभेच्छांचा वर्षाव स्वीकारत अमित आणि धीरज या दोघांनी घरासमोरील मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर विलासबाग या विलासराव देशमुख यांच्या स्मृतिस्थळी ते सहकुटूंब पोचले. त्यांनी विलासरावांना आदरांजली अर्पण केली. 'विलासराव देशमुख अमर रहे...' अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत बाभळगावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.