पालकांनो तुमचं काम होणार सोपं! शिक्षण विभागाने घेतला हा निर्णय

पालकांनो तुमचं काम होणार सोपं! शिक्षण विभागाने घेतला हा निर्णय

मुंबई : राज्यातील 5 ते 18 वर्षांच्या शालेय विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीकरण व अद्ययावतीकरण करण्याच्या सुचना शालेय शिक्षण विभागाने राज्यभरातील शाळांना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांमध्ये आधारकार्ड शिबिर आयोजित करावीत, अशा सुचना शिक्षण विभागाने दिली आहे. 

राज्यातील बहुतांश विद्यार्थ्यांची आधारकार्ड 5 वर्षाहून लहान असताना तसेच 15 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदर काढलेली आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे. यामुळे शाळांनी बॅंक, पोस्ट ऑफीस, बीएसएनएल तसेच यूआयडीएआयच्या नोंदणीकृत केंद्रावर जावून विद्यार्थ्यांची आधार नोंदणीकरण व अद्यावत करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आधार कार्ड नोंदणीची सक्‍ती शालेय शिक्षण विभागाने केली आहे. 

राज्यातील बहुतांश विद्यार्थ्यांची अद्याप आधार कार्डच काढलेली नाहीत. विद्यार्थ्यांची लहान असताना काढलेली आधार कार्ड आता अपडेट करण्याची गरज आहे. राज्यात 5 वर्ष व त्या पेक्षा लहान असलेल्या बालकांची संख्या लोकसंख्यानुसार 99 लाख 2 हजार 496 इतकी आहे. यापैकी 36 टक्के बालकांची आधार कार्ड काढलेली आहेत. तर 5 वर्षाहून अधिक वय असलेल्या आधार काढलेल्या बालकांची संख्या 2 कोटी 44 लाख 30 हजार इतकी आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांची आधार कार्ड लहान असताना काढलेली आहेत. 

त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्यावतीकरण करण्यासाठी शाळांमध्ये आधार कॅम्प लावण्याबाबत समन्वय साधावा तसेच आधार केंद्रांना संपर्क करुन शाळांत आधार कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना द्याव्यात, असे आदेश शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिले आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com