प्रतापगडावरील "त्या' क्षणांची मी साक्षीदार : शालिनीताई पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य वाचविण्यासाठी अफझलखानाचा कसा वध केला, याची माहिती सर्वांना होणे गरजेचे आहे. अत्यंत चुकीच्या पध्दतीने त्यांचा इतिहास मांडला गेला आहे. त्यामुळे तरुण पिढीने इतिहास जाणून घेतला पाहिजे असे श्रीमती पाटील यांनी नमूद केले.

कोरेगाव (जि. सातारा) : प्रतापगड (ता. महाबळेश्‍वर) येथे आज (मंगळवार) शिवप्रताप दिन साजरा होत आहे. तर किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला 61 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या अनावरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळाले. संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्रात त्या कार्यक्रमाची बहुधा मी एकमेव साक्षीदार राहिली असेन आणि मला त्याचा गर्व आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी केले.

 ''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  

आज (मंगळवार) किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात साजरा हाेत आहे. त्यापार्श्वभुमीवर श्रीमती पाटील म्हणाल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी दूरदृष्टीने निर्णय घेतल्याने स्वराज्य टिकवता आले. त्यांचा इतिहास व त्यातील बारकावे नवीन पिढीने जाणून घेतले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त करून श्रीमती पाटील म्हणाल्या, "छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य वाचविण्यासाठी अफझलखानाचा कसा वध केला, याची माहिती सर्वांना होणे गरजेचे आहे. अत्यंत चुकीच्या पध्दतीने त्यांचा इतिहास मांडला गेला आहे. त्यामुळे तरुण पिढीने इतिहास जाणून घेतला पाहिजे.

प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जगात सर्वांत वेगळा असा पुतळा तयार करण्यात आला. त्याचे अनावरण तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते व राजमाता सुमित्राराजे भोसले आणि यशवंतराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत 30 नोव्हेंबरला करण्याचे ठरले. 
 

हेही वाचा -  'तो' ऐतिहासिक व्हिडीओ जोपासला संजीवराजेंनी 

दरम्यान, पंडित नेहरू यांच्या एका पुस्तकाचा संदर्भ काहींनी पुढे करून त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होऊ नये, यासाठी मोठे प्रयत्न केले. ठिकठिकाणी रस्ते बंद करण्यात आले. या पार्श्वभूमीवर कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी वसंतरावदादा पाटील यांच्यावर होती. त्यांनी धुरंदरपणे पश्‍चिम महाराष्ट्रातील लोकांना कोकणातून प्रतापगडाच्या पायथ्याशी दोन दिवस आधीच पोचवले. दऱ्याखोऱ्यात थंडीवाऱ्यात हे लोक राहिले आणि 30 नोव्हेंबरच्या कार्यक्रमाला लोकांची मोठी गर्दी झाली होती. त्या कार्यक्रमाची मी साक्षीदार आहे, असे श्रीमती पाटील यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I Witnessed "Those" Moments At Pratapgad Says Shalinitai Patil