'म्हणून' शरद पवारांना म्हणतात जाणता राजा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 October 2019

डोक्यावर धो धो पडत असलेला पाऊस आणि या पावसात भाषण करणारा महाराष्ट्राचा सर्वात तरुण वक्ता.. अख्खा महाराष्ट्र ज्याला जाणता राजा म्हणून ओळखतो ते शरद पवार. कारण, पावसाची तमा न बाळगता पवारानी भाषण केलंय.

डोक्यावर धो धो पडत असलेला पाऊस आणि या पावसात भाषण करणारा महाराष्ट्राचा सर्वात तरुण वक्ता.. अख्खा महाराष्ट्र ज्याला जाणता राजा म्हणून ओळखतो ते शरद पवार. कारण, पावसाची तमा न बाळगता पवारानी भाषण केलंय.

वयाच्या 80 व्या वर्षातही तरुणांनाही लाज वाटेल, असा उत्साह त्यांच्यात दिसून आला. साताऱ्यात झालेल्या प्रचारसभेसाठी मोठा जनसमुदाय आला होता. सभेची जय्यत तयारी झाली होती. पवारांच्या चाहत्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. प्रत्येकाचे कान शरद पवारांचं भाषण ऐकण्यासाठी, डोळे त्यांची एक छबी टिपण्यासाठी आसुसले होते. मात्र, या उत्साहात पाऊस मिठाचा खडा टाकतोय की काय, अशी स्थिती निर्माण झाली.

मात्र, आपल्या आजारपणाची..  डोक्यावर कोसळणाऱ्या पावसाची कशाचीही तमा न बाळगता पवार मंचावर आले आणि त्यांनी भाषणाला सुरुवात केली.

पवारसाहेबांचं भाषण सुरू झाल्यावर खाली बसलेल्या प्रेक्षकांमध्येही उत्साह संचारला महिला, पुरुष सर्वच पवारांचं भाषण ऐकू लागले. महाराष्ट्रात पावसाळ्याचा हंगाम संपल्यानंतरही पावसाची हजेरी सुरूच आहे. या पावसामुळे अनेक नेत्यांना आपल्या प्रचारसभा रद्द कराव्या लागल्यात.

का आहेत पुढचे चार दिवस मुंबईकरांसाठी धोक्याचे?
 

साताऱ्यातल्या दहिवडी इथं शेखर गोरेंसाठी उद्धव ठाकरेंची सभा होती. मात्र, खराब हवामानामुळे त्यांनी आपली सभा रद्द केली. एकीकडे राज्यातले नेते पावसामुळे सभा रद्द करत असताना, शरद पवार मात्र अंगावर पावसाच्या धारा कोसळत असतानाही जनतेचा हिरमोड होऊ नये, यासाठी सभा घेतात. म्हणूनच तर अवघा महाराष्ट्र त्यांना जाणता राजा म्हणतो, हेही तितकंच खरं. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

राज ठाकरेंची 'ती' व्हायरल ऑडियो क्लिप तुम्ही ऐकली का ?

Chandrayaan 2 : इस्रोने ट्विट केला चंद्राच्या प्रकाशित भागाचा फोटो!

WebTitle : sharad pawar delivered public speech in heavy rain


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar delivered public speech in heavy rain