भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीला वेगळे वळण; चौकशी आयोगासमोर काय घडले?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

पुणे : भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या चौकशीला आज वेगळे वळण लागले आहे. चौकशी आयोगासमोर साक्ष देण्यास अॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी नकार दिला आहे. या निर्णयामागचे कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, आयोगासमोर काही गोष्टी आणण्याची इच्छा असल्याचे अॅड. गडलिंग यांनीच म्हटले होते. पण, आयोगासमोर हजर केल्यानंतर मात्र त्यांनी साक्ष देण्यास नकार दिला.

पुणे : भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या चौकशीला आज वेगळे वळण लागले आहे. चौकशी आयोगासमोर साक्ष देण्यास अॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी नकार दिला आहे. या निर्णयामागचे कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, आयोगासमोर काही गोष्टी आणण्याची इच्छा असल्याचे अॅड. गडलिंग यांनीच म्हटले होते. पण, आयोगासमोर हजर केल्यानंतर मात्र त्यांनी साक्ष देण्यास नकार दिला.

वाचा : आणखी एका आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा

शुक्रवारी सकाळी केले हजर
भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगासमोर साक्ष देण्यास संशयित आरोपी ऍड. सुरेंद्र गडलिंग यांनी शुक्रवारी नकार दिला. साक्ष नोंदविल्यास त्याचा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे साक्ष देणार नसल्याचे ऍड. गडलिंग यांनी आयोगासमोर स्पष्ट केले.  ऍड. गडलिंग आणि सुधीर ढवळे माओवादी संबंध प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दोघांनी चौकशी आयोगासमोर जुलै 2018 मध्ये प्रतिज्ञापत्र सादर करत, एल्गार परिषदेतील आम्ही प्रमुख घटक असून, काही महत्त्वपूर्ण गोष्टी आयोगासमोर आणू इच्छितो, असे म्हटले होते. त्यानुसार त्यांची 6 सप्टेंबर रोजी भीमा-कोरेगाव चौकशी आयोगासमोर साक्ष घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी ऍड. गडलिंग यांना आयोगासमोर हजर करण्यात आले. मात्र त्यांनी साक्ष देण्यास नकार दिला.

वाचा : पानसरे हत्याप्रकरणी अंदुरे, बद्दीसह मिस्किनला अटक 

बचावावर होणार परिणाम
आयोगाचे प्रमुख कोलकता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती जे. एन. पटेल आणि सदस्य सुम्मीत मलिक यांच्या समोर चौकशी सुरू आहे. ऍड. गडलिंग यांनी आयोगास सांगितले की, ""मला या प्रकरणातील काही बाबी आयोगाच्या समोर आणायच्या होत्या. त्यामुळे माझी साक्ष घ्यावी, अशी मागणी करणारे प्रतिज्ञापत्र केले होते. मात्र साक्ष दिल्यास त्याचा न्यायालयीन खटल्यात सुरू असलेल्या बचावावर परिमाण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मी आयोगाची माफी मागतो व आपले प्रतिज्ञापत्र मागे घेतो.'' न्यायालयात बचावाबाबत युक्तिवाद केल्यानंतर त्यांची माहिती आयोगासमोर येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

वाचा : नॉटरिचेबल हर्षवर्धन पाटील थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

ढवळेंची साक्ष केव्हा?
ढवळे यांनी उद्या (7 सप्टेंबर) आयोगासमोर साक्ष होणार आहे. त्याबाबत त्यांना व येरवडा प्रशासनास माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती आयोगाचे कामकाज पाहणारे वकील आशिष सातपुते यांनी दिली. आयोगाने कारागृहात येऊन तात्पुरत्या कोर्टरुमध्ये दोघांची साक्ष नोंदविण्याचा प्रस्ताव कारागृह प्रशासनाला दिला होता. परंतु, कारागृहाचेवतीने जुनी पुणे जिल्हा परिषद याठिकाणी आयोगाचे कामकाज सुरू असलेल्या जागी ढवळे यांना पुरेशा पोलिस बंदोबस्तात हजर करता येईल, असे कळविण्यात आले असल्याचे ऍड. सातपुते यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhima koregaon inquiry commission adv surendra gadling refuses to tell Evidence